लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर अवैध धंदे बंद करण्यासाठी गुन्हे प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी पथक नेमण्यात आले. गोंदियाच्या जुना बसस्थानकासमोरील बिर्सी गॅरेजसमोर चार ड्रममध्ये मादक पदार्थ ठेवले होते. नागपूर वाडी येथे जात असल्याचे सांगण्यात आले. त्या चार ड्रममध्ये १ हजार लीटर दारू किंमत २ लाख रूपयांची दारू जप्त करण्यात आलीे. ही कारवाई ५ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.तसेच एका मोटारसायकलवर गोरेगाव तालुक्यातील खाडीपार येथील सोमेश्वर दादीलाल गौतम (२४) हा एका बॅगमध्ये २५ बॉटल विदेशी दारू घेऊन जात असतांना गस्त घालणाऱ्या पोलिसांनी पकडले. मोटारसायकलसह ३६ हजार ८०० रूपयाचा माल जप्त करण्यात आले. दोन्ही घटनांसंदर्भात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई), ७७ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अतुलकर, सहाय्यक फौजदार गोपाल कापगते, पोलीस हवालदार मधुकर कृपाण, नायक पोलीस शिपाई नरेंद्र फुलबांधे, गजानन मारबते, पोलीस निरीक्षक कैलाश ठाकरे,नंदकिशोर टेंभरे, मेश्राम चालक ओंकार गौतम यांनी केली.
दोन लाख ३६ हजारांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST
एका मोटारसायकलवर गोरेगाव तालुक्यातील खाडीपार येथील सोमेश्वर दादीलाल गौतम (२४) हा एका बॅगमध्ये २५ बॉटल विदेशी दारू घेऊन जात असतांना गस्त घालणाऱ्या पोलिसांनी पकडले. मोटारसायकलसह ३६ हजार ८०० रूपयाचा माल जप्त करण्यात आले. दोन्ही घटनांसंदर्भात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई), ७७ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दोन लाख ३६ हजारांची दारू जप्त
ठळक मुद्देनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर : शहर पोलिसांच्या पथकाची कारवाई