पकडायला गेले दारू, मिळाले भेसळयुक्त डिझेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:29 AM2021-07-29T04:29:40+5:302021-07-29T04:29:40+5:30

तिरोडा : अवैध दारू विक्री विरोधात कारवाई करण्यास गेलेल्या तिरोडा पोलिसांना दारूऐवजी भेसळयुक्त डिझेल तयार करणारा अड्डा सापडला. दरम्यान ...

Alcohol seized, adulterated diesel found | पकडायला गेले दारू, मिळाले भेसळयुक्त डिझेल

पकडायला गेले दारू, मिळाले भेसळयुक्त डिझेल

Next

तिरोडा : अवैध दारू विक्री विरोधात कारवाई करण्यास गेलेल्या तिरोडा पोलिसांना दारूऐवजी भेसळयुक्त डिझेल तयार करणारा अड्डा सापडला. दरम्यान पोलिसांनी डिझेलचा मोठ्या प्रमाणात साठा आणि साहित्य जप्त केले. ही कारवाई २८ जुलै रोजी दुपारी तालुक्यातील बिरसी येथे करण्यात आली.

तिरोडा तालुक्यातील बिरसी नाला येथे आरोपी टिकेशकुमार शिवप्रसाद प्रजापती याने आपल्या घरी अवैधरित्या डिझेलचा साठा करून ठेवला होता. डिझेलमध्ये रॉकेल, थिनर टाकून भेसळ करून विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तालुका अन्न पुरवठा अधिकाऱ्यांना पाचारण केले. त्यांच्यासोबत पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी धाड टाकली. त्यावेळी एक इसम त्याच्या घरून शेतात पळून गेला. घराच्या सर्व दारांना कुलूप लावलेले होते. आतमध्ये डिझेलच्या कॅन, ड्रम दिसले. कुलूप फोडल्यावर प्लॅस्टिक कॅन, ड्रममध्ये १७५ लिटर डिझेल किंमत १६ हजार ९७५ रुपये, १५ लिटर रॉकेल किंमत ४८० रुपये, ४० लिटर थिनर किंमत ४ हजार रुपये, रिकामे ड्रम, प्लॅस्टिक चाळी, पाईप, मग्गा व इतर साहित्य असा एकूण २५ हजार २५५ रुपयाचा जप्त करण्यात आला. आरोपी टिकेशकुमार शिवप्रसाद प्रजापती याच्याविरुद्ध तिरोडा पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू अधिनियमचे कलम ३, ७ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव,पोलीस निरीक्षक योगेश पारधी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जोगदंड, पोलीस नाईक थेर,पोलीस शिपाई सवालाखे, अंबुले, भैरम यांनी केली.

Web Title: Alcohol seized, adulterated diesel found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.