एकोडीचे सरपंच अपात्र होणार?
By Admin | Updated: July 21, 2016 01:12 IST2016-07-21T01:12:54+5:302016-07-21T01:12:54+5:30
एकोडी येथील सरपंच रविकुमार ईश्वरलाल पटले यांच्यावर महाराष्ट्र ग्रा.पं.अधिनियम १९५८ चे

एकोडीचे सरपंच अपात्र होणार?
मुरूम प्रकरण : पंचायत समिती सदस्याने आणले प्रकरण चव्हाट्यावर
एकोडी : एकोडी येथील सरपंच रविकुमार ईश्वरलाल पटले यांच्यावर महाराष्ट्र ग्रा.पं.अधिनियम १९५८ चे कलम ३०(१) अन्वये कारवाई होण्याचे संकेत असल्याने त्यांच्यावर पदमुक्त होण्याची पाळी आली आहे.
जि.प.हायस्कूल एकोडी येथील प्रांगणात ३० ब्रास मुरूम रात्रीच्या वेळी अवैधरित्या उत्खनन करून वाहतूक केल्यानी त्यांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा दुरूपयोग केला. या प्रकरणात तहसीलदार गोंदिया यांच्याकडून तलाठी सुनिल राठोड यांनी २२ नोव्हेंबर २०१५ रोजी निवेदन दिले. त्यावरून पंचनामा करण्यात आला. त्यानुसार तहसीलदार संजय पवार यांच्या कार्यालयाकडून १८ फेब्रुवारी २०१६ च्या आदेशानुसार महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ४८ व त्या खालील नियमानुसार गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक रात्री केल्यामुळे गैरअर्जदार सरपंच यांनी सदर कायद्याचा भंग केला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम, १९६६ व कलम ४८ (७) नुसार एकूण ३० ब्रास मुरूम वाहतूक केल्याचे गैरअर्जदाराचे सिध्द झाल्याने त्याच्यावर १ लाख २ हजार रूपये दंड व स्वामीत्वधन १२ हजार रुपये असे एकूण १ लाख १४ हजार रुपये दंड वसूल करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी गोंदिया, उपअभियंता सा.बां. उपविभाग (रोहयो) खंड विकास अधिकारी गोंदिया, मंडळ अधिकारी गंगाझरी, तलाठी एकोडी त.सा.क्र.०१ यांना दंड वसुलीचे आदेश देण्यात आले.
या प्रकरणाची तक्रार उपायुक्त (सामान्य) प्रशान न्यायालय नागपूर यांच्याकडे पत्र क्रं. विशा/कार्या-११(२) कावी३८०/२०१६ दिनांक ३१ मे २०१६ रोजी एकोडी येथील पं.स.सदस्य जयप्रकाश टेकचंद बिसेन यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांच्याकडे चौकशीचे आदेश देण्यात आले.
यासंबंधी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गोंदिया यांनी पंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गोंदिया यांच्याकडे चौकशीचे आदेश दिले.
याप्रकरणाची चौकशी करण्याकरिता उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचा.) जि.प.गोंदिया यांनी सदर प्रकरणाची महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ चे कलम ३९(१) व (२) नुसार दि. १३/७/२०१६ रोजी आपले म्हणणे ऐकण्यासाठी वेळ सकाळी ११ वाजता ग्रा.पं.एकोडी येथे हजर राहण्यासंबंधी पत्र देण्यात आले होते. परंतु अती आवश्यक कामामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया हे एकोडी ग्रा.पं.येथे येऊ शकले नाही. त्याऐवजी अपीलार्थी व प्रतिवाद यांना आपले म्हणणे ऐकण्यासाठी समावेत आवश्यक दस्तावेजासह बोलावण्यात आले.
परंतु अपिलार्थी पं.स.सदस्य जयप्रकाश बिसेन एकोडी व प्रतिवादी सरपंच रविकुमार ईश्वरलाल पटले एकोडी यांची कोणत्याही प्रकारची चौकशी व शहानिशा न करता आपसात तडजोड करून प्रकरण संपवून घ्या, असे सांगून त्यापुढील चौकशी संदर्भात वेळ न देता प्रकरणाकडे दुर्लक्ष केले होते.(वार्ताहर)