आकाश भालेकरचा सत्कार

By Admin | Updated: February 27, 2016 02:10 IST2016-02-27T02:10:31+5:302016-02-27T02:10:31+5:30

येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील एनसीसी विद्यार्थी व सिनीअर वंडर आॅफिसर आकाश आनंद भालेकर याने ...

Akash Bhalker felicitated | आकाश भालेकरचा सत्कार

आकाश भालेकरचा सत्कार

गोंदिया : येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील एनसीसी विद्यार्थी व सिनीअर वंडर आॅफिसर आकाश आनंद भालेकर याने दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथ संचालनात महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून उत्कृष्ठ सहभाग घेतला. त्यानिमित्त एन.सी.सी. विभागात त्याचा बुधवारी सत्कार करण्यात आला.
आकाशचे एन.सी.सी.चे दुसरे वर्ष असून राज्य व राष्ट्रीयस्तरावरील शिबिरात त्याने उत्कृष्ट सहभाग घेतला. त्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रक्षामंत्री मनोहर पर्रिकर व डीजी, एसीसी प्रमुख अनिरुद्ध चक्रवर्ती यांच्यासोबत चहापार्टीत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रात्रीभोज कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व ग्रामीण क्षेत्रातून सहभागी झालेल्या आकाशाचे कौतूक करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश नासरे यांनी आयोजित कार्यक्रमात स्मृतिचिन्ह देऊन आकाशचा सत्कार केला. यावेळी कंपनी कमांडर लेफ्टनेंट प्रा.एच.पी. पारधी, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. बबन मेश्राम उपस्थित होते. याप्रसंगी औरंगाबाद येथील राज्यस्तरीय शिबिरात सहभागी दुर्गेश रहांगडाले, हरीशकुमार धावडे, कल्याणी ब्राह्मणकर, शुभम शिवकुमार लिल्हारे यांचाही सत्कार करण्यात आला.

Web Title: Akash Bhalker felicitated