वायू प्रदूषणामुळे होत आहे श्वसनाच्या आजारात वाढ
By Admin | Updated: November 22, 2014 00:45 IST2014-11-22T00:45:39+5:302014-11-22T00:45:39+5:30
ग्रामीण भागात फारशी कारखानदारी नसली तरी दिवसेंदिवस होत असलेला रसायनाचा उपयोग, मोठ्या प्रमाणात वृक्षाची कटाई वाहणाऱ्या

वायू प्रदूषणामुळे होत आहे श्वसनाच्या आजारात वाढ
रावणवाडी : ग्रामीण भागात फारशी कारखानदारी नसली तरी दिवसेंदिवस होत असलेला रसायनाचा उपयोग, मोठ्या प्रमाणात वृक्षाची कटाई वाहणाऱ्या संख्येत होणारी झपाट्याने वाढ यामुळे वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना श्वसनाचा रोगात दिवसे दिवस वाढ होऊन सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत.
ग्रामीण भागातील ग्राम पंचायत व आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचारी यांच्या निष्काळजी पणामुळे ग्रामीण भागात अस्वच्छता राहते. हे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होण्या मागील मुख्य कारण आहे. गावातील मोऱ्यामध्ये साचलेला केरकचरा, धान, सांड पाणी, पिण्याचे दूषीत पाणी यामुळे ही प्रदूषणात वाढ होऊन याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊन नवनवीन आजाराची उत्पत्ती होत आहे. यामुळे शासन प्रशासनाच्या प्रदूषण नियंत्रण व प्रतीबंध विभागाने प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर शोध मोहीम सुरू करावी. तसेच प्रदूषणास कारणीभूत व्यक्तीवर कायदेशीर अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहेत. ठिकठिकाणी गावातील मोऱ्या व हॅन्डपंपचा भोवताल सांडपाणी जमा होते. हवेच्या प्रदूषणात ही वाढ होत आहे. त्या हॅन्डपंम्पाच्या पाणी उपयोगात आणल्यास हगवन, पोटाचे विकार उद्भवतात. सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे हवेत प्रदूषण होऊन श्वसनाचे विकारांचा प्रादूर्भाव होत आहे. विविध कार्यक्रम समारंभामध्ये स्पिकर, डि.जे. साऊंड सिस्टम अशा ध्वनिक्षेपकाचा आवाज वाजवी पेक्षा अती जास्त असल्यामुळे व अशा आवाजाच्या सतत सानिध्यात राहील्याने त्याचा परिणाम थेट हृदयावर होत आहे. त्या प्रमाणे कानावर ही परिणाम होऊन कायम स्वरूपी बहिरेपणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सबंधीत विभागाने अशाप्रदूषणाबाबद सर्वत्र जनजागृती मोहीमांचे आयोजन करणे आवश्यक आहे.
वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या सर्वात अधीक समस्या उद्भवत आहे. वायू प्रदूषण म्हणजे हवेमध्ये घातक, दूषीत व उपायकारक पदार्थाचे मिश्रण होणे होय. डिझेल, पेट्रोल इतर इंधन, सिगारेट या माध्यमातून कार्बन मोनाक्साईड (रंगहीन वायू) बाहेर पडतो. त्यामुळे या वायूमुळे प्रदूषण जास्त होताना दिसते. या अपायकारक वायूचे प्रमाण वातावरणात वाढल्यामुळे प्राणवायूचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे शरीराची हालचाल मंदावत असून नागरिकांना अनेक शारीरिक समस्या जाणवत आहे. तसेच रासायनिक प्रदूषणामुळे घरघुती नि:सरण, कारखानदारी औद्योगिक कचरा, अवशेष कचऱ्यातून होणारी गळती, वातावरणातील उत्सर्जन, घरगुती निर्मूलन हे वायू प्रदूषणाचे स्त्रोत आहेत. वायू प्रदूषणामुळे सर्वात घातक परिणाम श्वसन संस्थेवर होते. प्राणवायूच्या अभावाने फुफ्फुसे कमजोर होऊन निकामी होण्याचा मार्गावर आहे. कार्बन मोनोक्साईड हिमोग्लोबीनमध्ये आॅक्सीजन ऐवजी मिसळून जातो. शरीरातील सर्व भागात पसरतो. त्यामुळे विविध आजाराची लागण होऊन प्राण गमवण्याची पाळी उद्भवत आहे. प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंधक विभागाने प्रदूषण शोध मोहीम वेळोवेळी सुरू करुन प्रदूषण होण्याच्या स्त्रोताचा शोध घेऊन नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.