तालुक्यातील ३४ हजार कुटुंबाला भेटी देण्याचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 05:00 AM2020-10-15T05:00:00+5:302020-10-15T05:00:06+5:30

मागास, दुर्गम, आदिवासी बहुल आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या अर्जुनीमोर तालुक्यातून कोरोनाला हद्दपार करण्याचा संकल्प प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्यातून घेतला आहे. सुरक्षित अंतर राखून गृहभेटीतून ही मोहीम राबविन्यात येत आहे. तालुक्यातील ३४ हजार कुटुंबातील १ लक्ष ३९ हजार नागरिकांना भेटी देण्याचे उद्दिष्ट आहे. नुकताच ३ ऑक्टोबरला जनजागृती मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. कोरोनापासून बचाव करण्याची प्रतिज्ञा तालुक्यात ठिकठिकाणी करण्यात आली होती.

Aim to visit 34 thousand families in the taluka | तालुक्यातील ३४ हजार कुटुंबाला भेटी देण्याचे उद्दिष्ट

तालुक्यातील ३४ हजार कुटुंबाला भेटी देण्याचे उद्दिष्ट

Next
ठळक मुद्देगृह भेटीतून घेणार आरोग्यविषयक माहिती : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व या विषाणूंमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी तसेच समाजातील प्रत्येक व्यक्तीला या आजाराची माहिती व्हावी, आपण कुठली काळजी घ्यावी यासाठी राज्य शासनाने या आजाराविषयी जनजागृती करणारे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेतंर्गत तालुक्यातील ३४ हजार कुटुंबांना भेद देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.
मागास, दुर्गम, आदिवासी बहुल आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या अर्जुनीमोर तालुक्यातून कोरोनाला हद्दपार करण्याचा संकल्प प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्यातून घेतला आहे. सुरक्षित अंतर राखून गृहभेटीतून ही मोहीम राबविन्यात येत आहे. तालुक्यातील ३४ हजार कुटुंबातील १ लक्ष ३९ हजार नागरिकांना भेटी देण्याचे उद्दिष्ट आहे. नुकताच ३ ऑक्टोबरला जनजागृती मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. कोरोनापासून बचाव करण्याची प्रतिज्ञा तालुक्यात ठिकठिकाणी करण्यात आली होती.
या मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढावा म्हणून आ. मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे,अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी कळिवले आहे. या मोहिमेद्वारे सर्व्हे टीम कुटुंबांना भेट देऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेबाबत माहिती देतआहे. कोरोना विषाणूची बाधा होऊ नये, म्हणून कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे शरीराचे तापमान व ऑक्सिजन पातळी मोजली जात आहे. सतत मास्क घालून राहावे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडून नये. दर दोन-तीन तासांनी सतत हात साबणाने व पाण्याने स्वच्छ धुवावे. ते शक्य नसल्यास सॅनिटायझरचा वापर करावा. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नये. ताप आल्यास तसेच सर्दी, खोकला,घसा दुखणे,थकवा अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींनी जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी. मधुमेह, हृदयविकार,किडनी आजार,लठ्ठपणा असल्यास दररोज तापमान व ऑक्सिजनची पातळी मोजली जात आहे.
तापमान ९८.६ पेक्षा जास्त असल्यास जवळच्या फीवर क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी करावी. सध्या सुरू असलेले आजारपणातील उपचार सुरू ठेवावेत. खंड पडू देऊ नये. डॉक्टरांकडून नियमित तपासणी करावी. असा सल्ला दिला जातो आहे.

मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुकास्तरावर बैठका घेण्यात आल्या. अर्जुनी मोरगावच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले,तहसीलदार विनोद मेश्राम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेंद्र खोब्रागडे, गटविकास अधिकारी राजेश वलथरे, आरोग्य, महसूल, शिक्षण विभाग तसेच आरोग्यसेविका, सेवक, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायतचे स्वयंसेवक आधी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Aim to visit 34 thousand families in the taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.