जिल्ह्यात १.२५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
By Admin | Updated: July 1, 2015 02:12 IST2015-07-01T02:12:55+5:302015-07-01T02:12:55+5:30
पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धन यासाठी शासनामार्फत दरवर्षी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनासाठी प्रोत्साहन दिले जाते.

जिल्ह्यात १.२५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
गोंदिया : पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धन यासाठी शासनामार्फत दरवर्षी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनासाठी प्रोत्साहन दिले जाते. सामाजिक वनीकरण विभागामार्फत ही योजना राबविली जाते. यंदा एक लाख २५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यासाठी जिल्हाभरात ६८ हजार ४४७ खड्ड्यांची कामेसुद्धा पूर्ण झाली आहेत.
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ नुसार वृक्ष हे माणसांचे सोयरेच असतात. संपूर्ण मानवी जीवनच वृक्षांवर अवलंबून आहे. वृक्ष संपदा नष्ट झाली तर मानवी जीवन आपोआपाच नष्ट होईल. त्यामुळे मानवी जीवन वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करणे काळाजी गरज झाली आहे. जिल्हाभरात रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची लागवड करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक तालुका स्तरावर त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. सध्या ६८ हजार ४४७ खड्डे खोदून पूर्ण झाले आहेत. तर उर्वरित खड्ड्यांचे काम येत्या काही दिवसात पूर्ण होईल.
वनविभागाच्या रेंजनुसार रोपट्यांची नर्सरी खासगी जागांवर तयार करण्यात आली आहे. जागा व पाण्याचे साधन पाहून नर्सरींना रोपट्यांचे उद्दिष्टसुद्धा देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)