शर्मा यांना अहल्याबाई होळकर जलमित्र पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 22:11 IST2017-11-12T22:11:00+5:302017-11-12T22:11:10+5:30

राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची प्रसिद्धी केल्यामुळे ‘लोकमत समाचार’चे पत्रकार मुकेश शर्मा यांना सन २०१५ या वर्षाचा जिल्हास्तरीय द्वितीय पुण्यश्लोक....

 Ahilyabai Holkar Jhammitra Award for Sharma | शर्मा यांना अहल्याबाई होळकर जलमित्र पुरस्कार

शर्मा यांना अहल्याबाई होळकर जलमित्र पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची प्रसिद्धी केल्यामुळे ‘लोकमत समाचार’चे पत्रकार मुकेश शर्मा यांना सन २०१५ या वर्षाचा जिल्हास्तरीय द्वितीय पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार देण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्यासाठी व्यक्ती आणि ग्रामपंचायतींना पुरस्कार दिले. सन २०१५ या वर्षात जलयुक्त शिवार योजनेला बळकटी देण्यासाठी केलेल्या कार्यामुळे शर्मा यांना जिल्हास्तरावरील पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १२ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सदर पुरस्कार गुरूवारी (दि.९) वर्धा येथील विकास भवनात जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, आमदार आशीष देशमुख, जलसंधारण सचिव एकनाथ डबले, आयुक्त अनुप कुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या वेळी गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे, मुख्य कार्यपालन अधिकारी रविंद्र ठाकरे, उपजिल्हाधिकारी रोहयो आर.टी. शिंदे, तसेच भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा येथील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी व कृषी अधीक्षक उपस्थित होते.

Web Title:  Ahilyabai Holkar Jhammitra Award for Sharma