लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : पशू संवर्धन विभाग गोंदिया व पंचायत समिती सडक अर्जुनी यांच्या संयुक्त विद्यमाने पळसगाव राका येथे तालुकास्तरीय पशू पक्षी प्रदर्शनी रविवारी आयोजित करण्यात आली होती.उद्घाटन आ.मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते पं.स.सभापती गिरधारी हत्तीमारे यांच्या हस्ते अध्यक्षतेखाली करण्यात आले. या वेळी प्रामुख्याने जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जि.प.गटनेते गंगाधर परसुरामकर, रमेश चुरहे, पाथोडे, पं.स. उपसभापती राजेश कठाने, शिला चव्हाण, कविता रंगारी, सुभाष कपगते, विलास शिवणकर, खंडविकास अधिकारी पी.डी.निर्वाण, पशुधन अधिकारी श्रीकांत पाटील वाघाये, पशुधन पर्यवेक्षक रोशन अन्द्रोस्कर, निलेश मलेवार उपस्थित होते. या वेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आ. चंद्रिकापुरे म्हणाले, सडक अर्जुनी तालुक्यातील शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशू पक्षी पालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.या दुधापासून प्रोडॅक्ट तयार करण्यासाठी एखादा कारखाना सुरू करण्याचा मानस असल्याचे सांगितले. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशू पक्षी पालन करणे गरजेचे आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांचा सर्वागिन विकास होऊच शकत नाही, असे सांगितले. तालुक्यातील शेतकºयांनी दुधाळू जनावरे, शेळ्या, म्हशी, कोंबडे, संकरित प्रजातींची जनावरे प्रदर्शनीत आणले होते. कार्यक्र माला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन आर.भांडारकर, डोगरवार यांनी केले तर आभार सुभाष कापगते यांनी मानले.
शेतीला पूरक व्यवसायाशिवाय पर्याय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST
या दुधापासून प्रोडॅक्ट तयार करण्यासाठी एखादा कारखाना सुरू करण्याचा मानस असल्याचे सांगितले. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशू पक्षी पालन करणे गरजेचे आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांचा सर्वागिन विकास होऊच शकत नाही, असे सांगितले. तालुक्यातील शेतकºयांनी दुधाळू जनावरे, शेळ्या, म्हशी, कोंबडे, संकरित प्रजातींची जनावरे प्रदर्शनीत आणले होते.
शेतीला पूरक व्यवसायाशिवाय पर्याय नाही
ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : पळसगाव येथे तालुकास्तरीय पशू पक्षी प्रदर्शनी