शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

नाल्याच्या पाण्यातून केली जातेय शेती

By admin | Updated: February 9, 2015 23:15 IST

शहरातली घाण घेऊन जात असलेल्या नाल्याच्या पाण्यातून शेती केली जात असल्याचा प्रकार शहरातील वसंतनगर परिसरात सुरू आहे. यामुळे मात्र या परिसरात दुर्गंधी व डासांचा

उग्र आंदोलनाचा इशारा : वसंतनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात गोंदिया : शहरातली घाण घेऊन जात असलेल्या नाल्याच्या पाण्यातून शेती केली जात असल्याचा प्रकार शहरातील वसंतनगर परिसरात सुरू आहे. यामुळे मात्र या परिसरात दुर्गंधी व डासांचा त्रास फोफावला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा प्रकार त्वरीत थांबविण्यात यावा यासाठी वसंतनगरातील महिला व पुरूष ८ फेब्रुवारी रोजी रस्त्यावर उतरले. नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांना हा संपूर्ण प्रकार दाखवून त्वरीत थांबविण्याची मागणी केली. वसंतनगरातील भरतदास वैष्णव यांच्याकडे १२ एकर शेती असून ते शेतीच्या सिंचनासाठी बोअर किंवा विहीरीची सोय न करता शेताला लागून जात असलेल्या नाल्याचे पाण़ी वापरत आहेत. नाल्यातल्या पाण्याने शेतीचे सिंचन केले जात असल्यामुळे मात्र परिसरात डास व दुर्गंध फोफावली आहे. शिवाय अशा दुषीत वातावरणामुळे आजारांचा जोर बळावण्याची दाट शक्यता असून नागरिक भितीत जीवन जगत आहेत. ८ फेब्रुवारी रोजी येथील नागरिकांच्या सहनशिलतेचा बांध अखेर फुटला व त्यांनी घराबाहेर पडून या समस्येवर तोडगा काढण्याचे ठरविले. नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालून सुरू असलेला हा प्रकार दाखविण्यासाठी त्यांनी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांना बोलाविले. नगराध्यक्ष जायस्वाल व नगरसेविका शोभा चौधरी यांचे प्रतिनिधी हरी चौधरी घटनास्थळी आले असता त्यांना संपूर्ण प्रकार दाखवून यावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी वसंतनगरवासीयांनी केली. विशेष म्हणजे या प्रकारासाठी येथील नागरिकांनी यापूर्वीही जिल्हाधिकारी, पोलीस व आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार दिली होती. मात्र त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. उलट वैष्णव यांना त्यानंतर अधिकच बळ मिळाले व त्यांनी नाल्याच्या पाण्यातूनच शेतीचे सिंचन करण्याचा सपाटा सुरू केला. आता मात्र वसंतनगरवासीयांच्या डोक्यावरून पाणी जात असल्याने नाल्याच्या पाण्यातून होत असलेली शेती बंद करण्याची, जागा शासनाने ताब्यात घेवून लहान मुलांसाठी बाग तयार करण्याची मागणी केली. मागण्यांची पूर्तता न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा नंदा राऊत, ईश्वरी रेड्डी, नंदीनी राव, रमेश मेंदे, पंकज पारधी, देवीलाल पारधी, एच.आर.बोपचे, वर्षा सुखदेवे, शकर चव्हाण, इंदू गजभिये, प्रशांत राणे, तुळसाबाई उके, डिंपल वाकडे, चंद्रकला उईके, बिमला सिन्हा, अनिता मेंढे, चंदा डडसेना, निलम खोटेले, मोहीत डडसेना, सरीता ब्राम्हणकरसह परिसरातील नागरिकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)