जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांना शेतीनिष्ठ पुरस्कार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:30 IST2021-04-02T04:30:17+5:302021-04-02T04:30:17+5:30

गोंदिया तालुक्यातील चुटीया येथील प्रगतीशील शेतकरी ऋषीकुमार युवराज टेंभरे, सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार येथील प्रवीण देवदास कापगते आणि तिरोडा ...

Agriculture Award to three farmers in the district () | जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांना शेतीनिष्ठ पुरस्कार ()

जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांना शेतीनिष्ठ पुरस्कार ()

गोंदिया तालुक्यातील चुटीया येथील प्रगतीशील शेतकरी ऋषीकुमार युवराज टेंभरे, सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार येथील प्रवीण देवदास कापगते आणि तिरोडा तालुक्यातील बिहिरीया येथील दुलीचंद नारायण पटले या तीन शेतकऱ्यांचा समावेश आहे. राज्यात कृषी व कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक भूषण, जिजामाता कृषी भूषण, कृषी भूषण (सेंद्रिय शेती), वसंतराव नाईक शेती मित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यान पंडित, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न आदी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या शेतकऱ्यांच्या निवडीबद्दल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांनी या शेतकऱ्यांचे कौतुक केले आहे.

Web Title: Agriculture Award to three farmers in the district ()