नवेगाव खुर्द येथे शेतकऱ्यांना शेती विषयक प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:50 IST2021-02-05T07:50:19+5:302021-02-05T07:50:19+5:30
याप्रसंगी उपवंशी यांनी, माती परीक्षणाचे महत्त्व, माती परीक्षण करण्याकरिता मातीचा नमुना घेण्याची पद्धत तसेच परीक्षण करून मिळालेल्या माती ...

नवेगाव खुर्द येथे शेतकऱ्यांना शेती विषयक प्रशिक्षण
याप्रसंगी उपवंशी यांनी, माती परीक्षणाचे महत्त्व, माती परीक्षण करण्याकरिता मातीचा नमुना घेण्याची पद्धत तसेच परीक्षण करून मिळालेल्या माती परीक्षण अहवालनुसारच पिकांना शिफारशीनुसार खत मात्रा द्यावी, त्याचप्रमाणे पिकांना लागणारे एकूण अन्नद्रव्य कोणती याबाबत माहिती दिली. सोनेवाने यांनी, सेंद्रिय खताचा वापर करून जमिनीची सुपीकता कशी वाढवता येईल, तसेच हिरवळीच्या खताचा उपयोग, ५ टक्के निंबोळी अर्क, जिवामृत, दशपर्णी अर्क, तसेच सेंद्रिय खते व कीटकनाशक इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. चव्हाण यांनी, मुख्य पिकावरील येणारे कीड -रोग व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. पाटील यांनी, जमिनीचे कर्ब कसा वाढविता येईल तसेच गांडूळ खत, बायोडायनामिक कंपोस्ट खत तयार करून शेतकऱ्यांनी शेतामध्ये याचा वापर करून जमिनीचा कर्ब वाढवावे याविषयी मार्गदर्शन केले.
संचालन ए. डब्ल्यू. गायधने यांनी केले. प्रास्ताविक पी. पी. खंडाईत यांनी मांडले. आभार आर. यू. बारई यांनी मानले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.