सालईटोलात कृषी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2016 01:56 IST2016-03-27T01:56:24+5:302016-03-27T01:56:24+5:30
सिध्दार्थ शेतकरी मंडळ सालईटोला (बापूटोला) व कृषी विभाग सालेकसा यांच्या संयुक्त विद्यमाने सालईटोला...

सालईटोलात कृषी मेळावा
शेतकऱ्यांची उपस्थिती : आधुनिक तंत्रज्ञानावर केले मार्गदर्शन
सालेकसा : सिध्दार्थ शेतकरी मंडळ सालईटोला (बापूटोला) व कृषी विभाग सालेकसा यांच्या संयुक्त विद्यमाने सालईटोला येथे एक दिवसीय कृषी मेळावा आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.
कृषी मेळाव्याचे उद्घाटन पं.स.सालेकसाचे सभापती हिरालाल फाफनवाडे यांनी केले. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत गांधीटोला येथील सरपंच रेखा टेकचंद फुंडे, प्रमुख अतिथी म्हणून माजी पं.स.सभापती तुकाराम बोहरे, उपसरपंच भुमेश्वर मेंढे, ग्रामसेवक एस.एस.रहांगडले, कृषी केंद्र संचालक गजानन राणे, राजू डोंगरे, देवराम चुटे, रमेश चुटे उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आत्मा गोंदियाचे प्रकल्प संचालक एच.एस.चव्हाण, उपसंचालक के.आर.सराफ, सालेकसाचे तालुका कृषी अधिकारी जी.जी.तोडसाम, विज्ञान केंद्र हिवराचे समन्वयक नौलाखे, सालेकसाचे पशु संवर्धन अधिकारी व्ही.झेड. कोटांगले उपस्थित होते.
प्रास्ताविक सेवानिवृत्त मुख्याध्यापकानी मांडले. कृषी मेळाव्याचे महत्व सांगीतले. याप्रसंगी प्रकल्प संचालक एच.एस.चव्हाण यांनी नगदी पिकांची शेती कशी करावी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्याचा आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी आधुनिक शेतीचे तंत्र कोणते यावर मार्गदर्शन केले. के.आर.सराफ यांनी पिकाची देखभाल व निगा कशी राखावी या बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान काही शेतकऱ्यांनी आपल्या अनेक अडचणी मांडल्या. त्यावर उपाययोजना कोणत्या कराव्यात याबद्दल मेळाव्यात चर्चा करण्यात आली. माजी सभापती तुकाराम बोहरे यांनी ही कृषीचा विकास साधण्यासाठी कोण-कोणती काळजी घ्यावी आणि कशी जमीनीची मशागत करावी याबद्दल मार्गदर्शन केले.
संचालन व आभार पवन पाथोडे यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक गावातील नागरिक उपस्थित होते. मार्गदर्शन मेळाव्यातून घेतलेल्या मार्गदर्शनातून शेतीचा विकास करण्याचा माणस शेतकऱ्यांनी बांधला. यशस्वीतेसाठी सिध्दार्थ शेतकरी मंडळाचे अध्यक्ष पार्थसिंह बैस, उपाध्यक्ष मुकेश शेंडे, सचिव के.जी.उके, जेठमल फटीक, देवकुमार शेंडे, यादोराव उके, युवराज फटीक, दुलीचंद सोनकवरे, अशोक चुटे, मोहनसिंग कनपुरीया, उत्तमजी औरासे, शंकर लोधे तसेच महिला बचत गट आणि पुरूष बचत गटाचे सदस्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)