‘आत्मा’ बचत गटांना कृषीविषयक मार्गदर्शन
By Admin | Updated: October 15, 2016 00:46 IST2016-10-15T00:46:54+5:302016-10-15T00:46:54+5:30
आमगाव फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने ग्रामपंचायत ठाणा येथे आत्मा बचत गटांना प्रोड्यूसर कंपनीचे

‘आत्मा’ बचत गटांना कृषीविषयक मार्गदर्शन
गोंदिया : आमगाव फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने ग्रामपंचायत ठाणा येथे आत्मा बचत गटांना प्रोड्यूसर कंपनीचे उद्देश, कार्य व शेतकरी आणि ग्राहकांच्या थेट विक्रीसाठी तयार करणे, याबाबत प्रोड्यूसर कंपनीचे संचालक किशोरकुमार कोरे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला आत्माच्या शिवणकर, सेवानिवृत्त उपवनसंरक्षक कुटमेटे व सरपंच अनिता अग्रे उपस्थित होत्या. कार्यक्रमात ठाणा, मानेगाव, दहेगाव, तिगाव, जवरी, खुर्शीपार येथील आत्मा गटातील सचिव व हिराटोला कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी शिवणकर, कुटमेटे, भारत गोंडाणे व बाबुराव कोरे यांनी कृषी गटातील सदस्यांना पारंपरिक शेती पद्धतीत सुधारणा करून नवनवीन प्रयोगाबरोबर तांत्रिक शेतीचा वापर करावा, असे मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे संचालक उमाशंकर शरणागत, मनोजकुमार कोरे, बेदराज बोपचे उपस्थित होते. (प्रतिनिधी)