बरबसपुरा येथे अग्नितांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:20 IST2018-05-07T22:19:48+5:302018-05-07T22:20:02+5:30

तालुक्यातील ग्राम बरबसपुरा येथे लागलेल्या आगीत तीन घरे जळून भस्मसात झाली. यामुळे गावातील तीन परिवार उघड्यावर आले. रविवारी (दि.६) रात्री ८ वाजतादरम्यान ही घटना घडली.

Agnitandav at Barbaspura | बरबसपुरा येथे अग्नितांडव

बरबसपुरा येथे अग्नितांडव

ठळक मुद्देतीन घरे भस्मसात : लाखो रुपयांचे नुकसान, कुटुंब उघड्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यातील ग्राम बरबसपुरा येथे लागलेल्या आगीत तीन घरे जळून भस्मसात झाली. यामुळे गावातील तीन परिवार उघड्यावर आले. रविवारी (दि.६) रात्री ८ वाजतादरम्यान ही घटना घडली.
बरबसपुरा निवासी सदाराम नागपुरे, भोजराज नागपुरे व थानसिंग लिल्हारे यांची तीन घरांची एक चाळ आहे. रविवारी (दि.६) रात्री ८ वाजतादरम्यान या चाळीत आग लागली व बघता-बघता चाळीतील तीनही घरे जळून खाक झाली. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती लगेच गोंदिया अग्नीशमन विभागाला दिली. त्यानंतर २० मिनीटांनी अग्नीशमन विभागाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन विभागाच्या दोन वाहनानी पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत एक दुचाकीही जळाल्याची माहिती आहे.
या आगीत तीनही परिवारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान या घटनेमुळे तीनही परिवार उघड्यावर आल्याची माहिती आहे. शॉट सर्कीटमुळे ही आग लागल्याचे बोलले जाते. अग्निशमन विभागाला माहिती मिळताच दोन गाड्या घटना स्थळी रवाना झाल्या. सुमारे २० मिनिटांत या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे. मात्र गाड्यांना उशिर झाला असे म्हणत गावकरी लाठ्या-काठ्या घेऊन अग्निशमन वाहन फोडण्यासाठी एकत्र आल्याचीही माहिती आहे.

Web Title: Agnitandav at Barbaspura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.