पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:27 IST2021-03-28T04:27:24+5:302021-03-28T04:27:24+5:30
आमगाव : केंद्रातील मोदी सरकारने नुकत्याच पारित केलेल्या तीन काळ्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशातील तमाम शेतकऱ्यांनी देशव्यापी आंदोलन ...

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन ()
आमगाव : केंद्रातील मोदी सरकारने नुकत्याच पारित केलेल्या तीन काळ्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशातील तमाम शेतकऱ्यांनी देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे. काँग्रेसने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नेहमीच पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ व पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीने शुक्रवारी (दि. २६ मार्च) धरणे आंदोलन केले.
तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने संजय बहेकार यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले. यात प्रामुख्याने गणेश हुकरे, जगदीश चुटे, छबू उके, भैयालाल बावनकर, उज्ज्वल ठाकूर, रामेश्वर श्यामकुवर, महेश उके, संतोष सतीशहारे, प्रभा उपराडे, नरेश बोपचे, यादोराव भोयर, रमेश गायधने, दीपक शर्मा, तारेंद्र रामटेके, होलीराम बिसेन, राजेंद्र रहांगडाले व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रपतींच्या नावे तहसीलदारांना देण्यात आले.