शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यानेच राजीनामा-पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:50 IST

संवैधानिक विरोधी काम करणाऱ्या केंद्र शासनाने युवक, शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब, शेत मजुरांसाठी, सुशिक्षीत बेरोजगारांसाठी व महिलांच्या न्याय हक्कासाठी माझ्या लढवय्या वृत्तीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे मी खासदारकीचा राजीनामा दिला. जनतेचा माझ्यावर असलेल्या विश्वासापोटी,

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : संवैधानिक विरोधी काम करणाऱ्या केंद्र शासनाने युवक, शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब, शेत मजुरांसाठी, सुशिक्षीत बेरोजगारांसाठी व महिलांच्या न्याय हक्कासाठी माझ्या लढवय्या वृत्तीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे मी खासदारकीचा राजीनामा दिला. जनतेचा माझ्यावर असलेल्या विश्वासापोटी, प्रेमापोटी मी कुठेही असलो तरी त्याच जोमाने, ताकदीने आपले कार्य करीत राहील, अशी स्पष्टोक्ती माजी खासदार नाना पटोले यांनी केशोरी येथे आयोजित जाहीर सभेत केली.डॉ. राधाकृष्णन हायस्कूल कनेरीच्या पटांगणावर केशोरी परिसरातील शेतकऱ्यांसाठी आयोजित जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. तालुका काँग़्रेस कमेटीचे उपाध्यक्ष नारायण घाटबांधे, प्रमुख पाहुणे म्हणून तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष भागवत पाटील नाकाडे, दिलीप डोये, राजेश नंदागवळी, रेखा समरीत, प्रमोद लांजेवार, नितीन पुगलिया, पोर्णिमा शहारे, पटले, आशा झिलपे, विशाखा शहारे, हेमंत भांडारकर, माणिक घनाडे, बाबुराव पाटील गहाणे, नरेश पाटील गहाणे, श्रीकांत घाटबांधे, विनोद गहाणे, चेतन शेंडे व हजारोंच्या संख्येत शेतकरी उपस्थित होते.पटोले म्हणाले, केंद्र व राज्य सरकार जाती-जातीत तेढ निर्माण करुन महाराष्ट्र पेटविण्याचे काम करीत आहे. हे थांबविणे अत्यंत गरजेचे आहे.कोरेगाव भिमा प्रकरणी राज्य शासन दोषी असल्याचे सांगून लोकांमध्ये मत भिन्नता निर्माण करण्याचे विष पेरीत आहे. स्थळांचे संरक्षण करणे ही शासनाची जबवादारी असते.शेतकºयांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करुन शेतकऱ्यांचे हित जोपासून शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमी भाव देणे आवश्यक आहे. जे शासन शेतकरी, गोरगरीबांचा विचार करीत नसेल तर अच्छे दिन येण्याचा विचार करु नका असे ते म्हणाले. सुशिक्षीत बेरोजगारांचा प्रश्न सोडविण्यापेक्षा राजकारण हे व्यवसाय म्हणून करणाऱ्या शासनाला वटणीवर आणणे गरजेचे आहे, असे मत माजी खासदार पटोले यांनी या वेळी व्यक्त केले. तसेच कुठलाही पक्षात असलो तरी शेतकऱ्यांसाठी लढा सुरू राहिल असे सांगितले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले