चार दिवसानंतर होतील १२५ शाळा ‘प्रगत’

By Admin | Updated: December 29, 2016 01:10 IST2016-12-29T01:10:55+5:302016-12-29T01:10:55+5:30

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने गोंदिया जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे.

After four days, there will be 125 schools 'advanced' | चार दिवसानंतर होतील १२५ शाळा ‘प्रगत’

चार दिवसानंतर होतील १२५ शाळा ‘प्रगत’

ज्ञान रचनावादाचा फायदा : जिल्ह्यातील ६०१ शाळांमधील दर्जा सुधारला
नरेश रहिले  गोंदिया
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने गोंदिया जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. प्रगत महाराष्ट्रातील पहिला जिल्हा म्हणून गोंदियाला नावारूपास आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. २७ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील १०४८ पैकी ६०१ शाळा १०० टक्के प्रगत झाल्या. उर्वरीत चार दिवसात १२५ शाळा प्रगत होत आहेत. त्यामुळे डिसेंबरअखेर ७२७ शाळा ‘प्रगत’ म्हणून गणल्या जाणार आहेत.
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला दर्जेदार व गुणवत्तायुक्त शिक्षण देणे ही राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांची जबाबदारी आहे. अध्ययन संपादणूक सर्व्हेच्या अहवालानुसार अपेक्षित अध्ययन निष्पती प्राप्त न झाल्याचे शासनाच्या लक्षात आल्याने राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २२ जून २०१५ रोजी एक शासन निर्णय काढून शिक्षण क्षेत्रात क्रांतीकारी बदल घडवून आणण्याचा माणस बांधला आहे.
या उपक्रमाला कृतीत उतरवून राज्यात प्रगत शिक्षणात गोंदिया जिल्हा प्रथम असावा यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग काम करीत आहे. शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना प्रगत करण्याचा माणस बांधला. याची फलश्रृती म्हणजे जिल्ह्यातील ६०१ शाळां शंभरटक्के प्रगत झाल्या आहेत. प्रत्येक बालक ज्ञानरचनावादी पध्दतीने शिक्षण देत लेखन, वाचन व गणित क्रिया प्राप्त करणे आवश्यक आहे. बालकाचा बहुमुखी विकास करण्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये अनेकांगी बदल करण्यात आला आहे.

Web Title: After four days, there will be 125 schools 'advanced'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.