शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

अखेर सात हजार कर्मचाऱ्यांची वेतन कपात मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:23 PM

विविध मागण्यांकरिता राज्यस्तरीय कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार ७,८ आणि ९ आॅगस्ट २०१८ हे तीन दिवस राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्यात आले होते. खुद्द मुख्यमंत्री यांच्या आश्वासनावरून संघटनांनी हे आंदोलन मागे घेतले होते. मात्र यानंतर जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या आंदोलनात सहभागी ७ हजार कर्मचाऱ्यांचे तीन दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला होता.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश : शिक्षकांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विविध मागण्यांकरिता राज्यस्तरीय कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार ७,८ आणि ९ आॅगस्ट २०१८ हे तीन दिवस राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्यात आले होते. खुद्द मुख्यमंत्री यांच्या आश्वासनावरून संघटनांनी हे आंदोलन मागे घेतले होते. मात्र यानंतर जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या आंदोलनात सहभागी ७ हजार कर्मचाऱ्यांचे तीन दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात यावा यासाठी कर्मचारी संघटनानी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला होता. त्याचीच दखल मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी वेतन कपातीचा निर्णय मागे घेण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले आहे.कर्मचाºयांच्या विविध मागण्यांना घेवून राज्यस्तरीय संघटनेच्या नेतृत्त्वात तिन दिवस कामबंद आंदोलन करण्यात आले. मात्र आंदोलनात सहभागी कर्मचाºयांचे तीन दिवसाचे वेतन राज्यात कुठेच कपात करण्यात आले नाही. केवळ गोंदिया जिल्ह्यातच याची अंमलबजावणी करण्यात आली होती. गोंदिया जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना हा निर्णय घेतला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर असलेल्या विविध संवर्गातील सुमारे ७ हजार कर्मचाºयांचे तीन दिवसांचे वेतन कपात करण्यात आले. हा कर्मचाºयांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार असल्याचा आरोप करण्यात आला होता.दरम्यान महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे आणि इतर पदाधिकाºयांनी वेतन कपातीचा निर्णय मागे घेण्यात यावा याकरिता जिल्हा परिषद ते मंत्रालयापर्यंत धाव घेतली. शिक्षणमंत्री, ग्राम विकासमंत्री यांच्यासह आमदार खासदारांची भेट घेतली. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिरोडा येथे आले असता आमदार विजय रहांगडाले यांच्या नेतृत्त्वात त्यांची भेट घेवून वेतन कपात मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती.यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मंगळवारी (दि.२८) दुपारी १ वाजता मुंबई येथे आमदार विजय रहांगडाले यांनी वेतन कपातीच्या मुद्दावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेतन कपात मागे घेण्याचे निर्देश दिले.या निर्णयामुळे अधिकारी आणि कर्मचाºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयाचा लाभ जि.प.च्या आस्थापनेवर असलेल्या सात हजार कर्मचाºयांना होणार आहे.या निर्णयाचे स्वागत शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे, नूतन बांगरे, अनिरुद्ध मेश्राम, उमाशंकर पारधी, सुधीर बाजपेयी, नागसेन भालेराव, केदार गोटेफोडे, हेमंत पटले, विनोद लिचडे, यशोधरा सोनवाने, वाय.डी. पटले, नरेंद्र आगाशे, सुरेश रहांगडाले, दिनेश बोरकर, विनोद चौधरी, गौरीशंकर खराबे, ए.डी.पठाण, मोरेश्वर बडवाईक, सुशील रहांगडाले, मयूर राठोड, रमेश संग्रामे, विजय डोये, तोषीलाल लिल्हारे, अमोल खंडाईत, अयूब खान, श्रीधर पंचभाई, डी. आय. कटरे, शंकर नागपुरे, योगेश्वर मुंगूलमारे, शंकर चव्हाण, दुर्गाप्रसाद कोकोडे तसेच सर्व जिल्हा आणि तालुका पदाधिकाºयांनी आभार मानले आहे.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस