शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ व्यापार संकुलाचे बांधकाम बंद

By admin | Updated: May 11, 2016 01:40 IST

आमगाव ग्रामपंचायत अंतर्गत झुडूपी जंगल महसूलच्या जमिनीवर जिल्हा परिषदेने व्यापार संकुल बांधकामाचे प्रस्ताव

आमगाव : आमगाव ग्रामपंचायत अंतर्गत झुडूपी जंगल महसूलच्या जमिनीवर जिल्हा परिषदेने व्यापार संकुल बांधकामाचे प्रस्ताव मंज़ूर करुन अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. या दोषपूर्ण प्रक्रियेला नागरिकांनी विरोध दर्शवून न्यायालयात धाव घेतली. परंतु बांधकाम बंद करण्यास बांधकाम विभाग तयार नव्हते. या मुजोरशाहीविरुद्ध नागरिकांनी ९ मे पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी हे बांधकाम बंद करण्याचे निर्देश दिले. आमगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेले महसूल झुडपी जंगल या भुखंडावर जिल्हा परिषदेने आर्थिक व्यवहार घडवून या ठिकाणी व्यापार संकुल बांधकामाचा प्रस्ताव अनधिकृतपणे मंजूर करुन घेतला. परंतु गट क्र. २३५, २३६ या भुखंडावरील मालकी महसूल झुडपी जंगलाप्रमाणे शासकीय रेकॉर्ड आहे. जिल्हा परिषदेने या भूखंडावर व्यापारी संकुल बांधण्यासाठी मालकी हक्क असणाऱ्या विभागाची कोणतीच परवानगी घेतली नाही. जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले नाही. त्यामुळे या वादग्रस्त प्रस्तावाला नागरिकांनी आधीपासून विरोध दर्शविला. परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभागाने हे बांधकाम तातडीने पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. या वादग्रस्त व्यापार संकुल बांधकामाला नागरिकांनी न्यायालयात दाद दिली. सदर बांधकाम बंद करुन अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई व्हावी यासाठी नागरिकांनी पाठपुरावा केला. सदर बांधकाम बंद करण्यासाठी नागरिकांच्या मागणीकडे जि.प. बांधकाम विभाग बक्ष देत नसल्यामुळे नागरिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून निवेदन दिले. तसेच ९ मे पासून उपोषण करणार असल्याचे पत्रही दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश देताच बांधकाम विभाग व तहसीलदार यांनी बांधकाम बंद करण्यास सांगितले. (शहर प्रतिनिधी)