दुधात होतेय भेसळ

By Admin | Updated: November 15, 2015 01:20 IST2015-11-15T01:20:02+5:302015-11-15T01:20:02+5:30

दूध हा प्रत्येकाच्या दैनंदिन वापरातील अत्यंत आवश्यक पदार्थ आहे. प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात देखील दुधापासून तयार झालेल्या चहानेच होते.

Adulthood adulteration | दुधात होतेय भेसळ

दुधात होतेय भेसळ

कारवाईची मागणी : रसायनाच्या वापराने शुद्धता हरपली
गोंदिया : दूध हा प्रत्येकाच्या दैनंदिन वापरातील अत्यंत आवश्यक पदार्थ आहे. प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात देखील दुधापासून तयार झालेल्या चहानेच होते. मात्र दूध विक्रेते कमीत कमी वेळात अल्पसा श्रम करून लवकरात लवकर श्रीमंत कसे होता येईल यासाठी दुधात भेसळ करीत असल्याचे चित्र आहे.
दुधात भेसळ करून अधिकचा नफा मिळविण्याच्या बेतात आपणच आपल्या जवळील असलेल्या लोकांच्या जीवनाशी खेळ करीत आहोत, ही बाब कदाचित विसरली जात आहे. प्रत्येकांची दैनंदिन गरज असलेल्या दुधामध्ये अनेक प्रकारच्या रासायनिक द्रव्यांची भेसळ केली जात असल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. मात्र अन्न व औषध प्रशासन विभाग अशा भेसळखोरांवर कठोर कारवाई करीत नसल्याने दुधात भेसळ करण्याच्या गोरखधंदा परिसरात फोफावत आहे.
दूध लहान चिमुकल्या मुलाबाळांसाठी अमृत समझला जातो. डॉक्टरही आजारी रुग्णांना दूध पिण्याचा सल्ला देतात. दुधामध्ये असलेले भरपूर प्रथिने मानवी आरोग्याकरिता लाभदायक असले तरी हिंदु संस्कृतीप्रमाणे दुधाला एक पवित्र द्रव्य म्हणून दुधाचा उपयोग होमहवन, पूजापाठ यात केला जातो. मात्र सध्या बाजारात विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या दुधाच्या शुध्दीकरणावर भेसळखोरीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बऱ्याच दूध व्यवसायिकांनी दुधामध्ये भेसळ करून त्या दुधाची राजरोसपणे विक्री करतात. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Adulthood adulteration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.