जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST2020-06-24T05:00:00+5:302020-06-24T05:00:25+5:30

जिल्ह्यात अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे आहेत. मात्र अद्यापही जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात पर्यटक येत नाही. पर्यटनस्थळी सोयी-सुविधांचा अभाव जिल्ह्यात कायम आहे. त्यातच पर्यटनस्थळ विकासाकडेही दुर्लक्ष होत असल्याने रोजगाराच्या संधीही जिल्ह्यात कमी होत आहेत. संपूर्ण राज्यात फक्त पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर तसेच लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यात सारस पक्ष्यांचे वास्तव्य आहे. जोडप्याने राहणारे सारस हे पर्यटकांना आकर्षीत करतात.

Administration's neglect of development of tourist places in the district | जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

ठळक मुद्देतिरोडा तालुक्यात पर्यटन विकासाला वाव : दखल घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात पर्यटनाला वाव असला तरी येथील पर्यटन अद्यापही उपेक्षीत आहे. काही वर्षापूर्वी जिल्ह्यात सारस पक्ष्यांचे माध्यमातून पर्यटनाला चालना देणयचे काम तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या कार्यकाळात झाले. त्यानंतर मात्र जिल्ह्यातील पर्यटन विकासाकडे स्थानिक प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. त्यातच तालुक्यातील झिलमिली, परसवाडा येथे सारसांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्या अनुषंगाने या गावांना राजाश्रय प्राप्त झाल्यास पर्यटनाच्या दृष्टीकोनातून हे नवीन स्थळ विकसीत होऊ शकतात.
जिल्ह्यात अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे आहेत. मात्र अद्यापही जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात पर्यटक येत नाही. पर्यटनस्थळी सोयी-सुविधांचा अभाव जिल्ह्यात कायम आहे. त्यातच पर्यटनस्थळ विकासाकडेही दुर्लक्ष होत असल्याने रोजगाराच्या संधीही जिल्ह्यात कमी होत आहेत. संपूर्ण राज्यात फक्त पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर तसेच लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यात सारस पक्ष्यांचे वास्तव्य आहे. जोडप्याने राहणारे सारस हे पर्यटकांना आकर्षीत करतात. गोंदिया तालुक्याच्या विचार केल्यास पर्यटनाच्या दृष्टीकोनातून नागरा व कामठा ही पर्यटनस्थळे असली तरी ती धार्मिक स्थळे आहेत. परंतु काही वर्षापासून झिलमिली व परसवाडा येथील तलाव परिसरात सारस पक्ष्यांचे वास्तव्य असून त्यांच्या संख्येत वाढही होत आहे. आजघडीला ७ ते ८ पर्यंत सारस पक्ष्यांची संख्या झाली आहे. या परिसराचा विकास केल्यास सारस पक्ष्यांची संख्य वाढू शकते.यामुळे पर्यटकही वाढू शकतात, अशी माहिती पर्यावरण प्रेमी छत्रपाल चौधरी, राज तिवारी, शरद गजभिये, शंकरलाल बनोटे, दिपकिशन बिसेन आदीनी दिली.

Web Title: Administration's neglect of development of tourist places in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन