शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांसाठी प्रशासन मार्ग काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:00 IST

कोरोनाला गावातून हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थांना सतर्क राहावयाचे आहे. प्रसंगी घाबरुन दूर राहणे यातच गावचे हित आहे. नागरिकांचे हीत व आरोग्याच्या दृष्टीने कुणीही गावाबाहेर जाऊ नये. गावच्या सर्व सीमा आवागमनासाठी बंद करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत गावात जीवनावश्यक वस्तू, आरोग्य सेवा घरपोच देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शेतीच्या हंगामासाठी मार्ग काढू, कृषी कर्ज तसेच आर्थिक व्यवहार करता यावे म्हणून गावातच सोय केली जाईल.

ठळक मुद्देएसडीओ : गावातील पदाधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक, विविध विषयांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : गाव कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याने ग्रामवासीयांनी आदेशातील नियमांचे तंतोतंत पालन करावे. गावातील जनतेने गावची सीमा ओलांडून गावाबाहेर जाण्याचा प्रयत्न करु नये. कोणत्याही व्यक्तीला गावाबाहेर न जाता आवश्यक सोयी-सुविधांची पुर्तता केली जाईल. खरीप हंगामापूर्वी करण्यात येणारी शेत मशागतीचे कामे करण्यासाठी प्रशासन स्तरावरुन मार्ग काढण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल असे उपपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे यांनी सांगीतले.ग्राम सिलेझरी येथील २० वर्षीय तरूण कोरोना बाधीत आढळल्याने गाव कंटेन्मेंट झोनमध्ये टाकण्यात आले आहे. अशात सिलेझरीवासीयांना कोणतीही अडचण भासू नये व शेतीच्या हंगामात आडकाठी निर्माण होऊ नये यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गावातील पदाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.याप्रसंगी तहसीलदार विनोद मेश्राम, खंड विकास अधिकारी मयुर आंदेलवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय राऊत, पोलीस निरीक्षक महादेव तोंदले, सपोनि. प्रशांत भुते, पोलीस उपनिरीक्षक देवीदास शेवाळे, सरपंच प्रकाश टेंभुर्णे, पोलीस पाटील नंदेश्वर, माजी सरपंच डॉ. धार्मिक गणवीर, आपातकालीन समितीचे सदस्य सुखदेव मेंढे, पी.एच.नंदेश्वर, तलाठी, ग्रामसेवक तथा संपर्क अधिकारी बी.आय.पटणे उपस्थित होते.पुढे बोलताना सोनाळे यांनी, कोरोनाला गावातून हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थांना सतर्क राहावयाचे आहे. प्रसंगी घाबरुन दूर राहणे यातच गावचे हित आहे. नागरिकांचे हीत व आरोग्याच्या दृष्टीने कुणीही गावाबाहेर जाऊ नये. गावच्या सर्व सीमा आवागमनासाठी बंद करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत गावात जीवनावश्यक वस्तू, आरोग्य सेवा घरपोच देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शेतीच्या हंगामासाठी मार्ग काढू, कृषी कर्ज तसेच आर्थिक व्यवहार करता यावे म्हणून गावातच सोय केली जाईल. रब्बी धानाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांचे हीत जपले जाईल. गावातील सर्वाची आरोग्य तपासणी नित्यनेम करण्यासाठी आरोग्य कर्मचारी आपल्या दारापर्यंत येणार. स्थानिक पदाधिकाºयांनी गावात जागृती करावी. प्रतिकार शक्ती वाढवून कोरोनावर मात करावी. सर्वांनी खबरदारी घेऊन एकदिलाने आदेशाचे पालन करावे असेही सांगीतले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या