जिल्ह्यात नवीन ९ बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:50 IST2021-02-05T07:50:41+5:302021-02-05T07:50:41+5:30

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ वर-खाली होत आहे. मंगळवारी (दि. २६) थेट २३ वर गेलेली नवीन बाधितांची संख्या बुधवारी ...

Addition of 9 new victims in the district | जिल्ह्यात नवीन ९ बाधितांची भर

जिल्ह्यात नवीन ९ बाधितांची भर

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ वर-खाली होत आहे. मंगळवारी (दि. २६) थेट २३ वर गेलेली नवीन बाधितांची संख्या बुधवारी (दि. २७) मात्र कमी झाली असून, ९ नवीन बाधितांची भर पडली आहे. यावरून जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. बुधवारच्या आकडेवारीनंतर जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या १४,१५७ झाली असून १३,८३५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आता १४० क्रियाशील रुग्ण आहेत. तर १८२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बुधवारी जिल्ह्यात आढ‌ळलेल्या ९ बाधितांमध्ये गोंदिया तालुक्यातील ४, गोरेगाव १, आमगाव १, देवरी १ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २ रुग्ण आहेत. कोरोनावर मात करणाऱ्या १२ रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील ८, तिरोडा २, गोरेगाव १ तर इतर राज्य व जिल्ह्यातील १ रुग्ण आहे. आता जिल्ह्यात १४० क्रियाशील रुग्ण असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ८६, तिरोडा ४, गोरेगाव ६, आमगाव १७, सालेकसा ११, देवरी ५, सडक-अर्जुनी ३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६ तर इतर राज्य व जिल्ह्यातील २ रुग्ण आहेत. जिल्ह्यातील ६८ रुग्ण घरीच अलगीकरणात असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४१, तिरोडा २, गोरेगाव ३, आमगाव ९, सालेकसा ८, देवरी २, सडक-अर्जुनी १, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २ रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ५ तालुक्यांत १० च्या आत क्रियाशील रुग्ण असून यामुळे हे तालुके आता कोरोनामुक्तीच्या वाटेवर दिसत आहेत.

-----------------------------

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९० टक्के

जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत असल्याचे दिसत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९० टक्के नोंदविण्यात आले आहे. म्हणजेच, जिल्ह्यातील स्थिती राज्य व देशातील स्थितीपेक्षा बरी असल्याचे दिसून येत आहे. तर द्विगुणीत गती २२६.४ दिवस एवढी नोंदविण्यात आली आहे. याशिवाय मृत्युदर १.२० एवढा नोंदण्यात आला असून, आतापर्यंत जिल्ह्यात १८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

------------------------------

आतापर्यंत १,२९,०७१ चाचण्या

जिल्ह्यात आतापर्यंत १,२९,०७१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ६४,३६८ आरटी-पीसीआर चाचण्या असून त्यामध्ये ८,३६४ चाचण्या पॉझिटिव्ह तर ५२,७६४ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तसेच ६४,७२३ रॅपिड अँटिजेन चाचण्या असून यामध्ये ६,०८४ चाचण्या पॉझिटिव्ह तर ५८,६३९ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.

Web Title: Addition of 9 new victims in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.