व्यसनामुळे प्रगती होत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:08 IST2017-09-25T00:08:19+5:302017-09-25T00:08:38+5:30

व्यसनामुळे प्रगती होत नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : समाजात दिवसेंदिवस व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. व्यक्ती समाज आणि देशाच्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण होत आहे. ज्या युवकांच्या आधारावर देश प्रगती करायचे स्वप्न पाहतो. त्या देशातील युवक अंमली पदार्थांच्या सेवनात गुरफटला आहे. व्यसनाधीनतेमुळे प्रगती होत नाही, असे प्रतिपादन न्यायाधीश व्ही. ए. साठे यांनी केले.
येथील राजीव गांधी महाविद्यालयात न्यायालयीन प्राधीकरण, सडक अर्जुनी वकील संघ आणि राजीव गांधी महाविद्यालयाच्या संयुक्तवतीने आयोजीत अंमली पदार्थाचे होणारे वाईट परिणाम व त्यावरील कायदा यावरील मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डी.डी. चौधरी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डुग्गीपारचे ठाणेदार किशोर पर्वते, अॅड. बन्सोड, अॅड. सुरेश गिºहेपुंजे, अॅड. गहाणे, प्रा. दिवाकर कांबळे, आर.के. भगत, कृष्णा थेर, डॉ. पल्लवी देशमुख, डॉ. संजय पाखमोडे, न्यायालयातील पी.एल.व्ही. भारती मेश्राम, मंजू कोरे, मीनाक्षी साखरे, संतोष बोरकर उपस्थित होते.
पुढे बोलताना न्यायाधीश साठे यांनी, मोठ्या शहरात वाढत असलेली रेव्हपार्टी हा चिंतेचा विषय ठरत आहे. आजच्या विद्यार्थ्यांवर आई-वडीलांकडून चांगले संस्कार होण्याची गरज आहे. शाळा महाविद्यालयांकडून चांगली स्थिती महत्वाची असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
ठाणेदार पर्वते यांनी, आजचा युवक व्यसनाच्या अधीन लवकर जातो. चांगल्या गोष्टी उशिरा शिकतो ही चिंताजनक बाब असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. कृष्णा थेर यांनी मांडले. संचालन प्रा. राजकुमार भगत यांनी केले. आभार डॉ. संजय पाखमोडे यांनी मानले.