जप्त केलेले ३२ लाख जीपीएफमध्ये जमा करा

By Admin | Updated: July 23, 2016 02:22 IST2016-07-23T02:21:06+5:302016-07-23T02:22:00+5:30

येथील पंचायत समिती मधील कोट्यावधीचा घोळ करणाऱ्या बाबूकडून ३२ लाख रुपये जप्त करण्यात आले.

Add it to the 32 million GPF seized | जप्त केलेले ३२ लाख जीपीएफमध्ये जमा करा

जप्त केलेले ३२ लाख जीपीएफमध्ये जमा करा

शिक्षक समितीची मागणी : खंडविकास अधिकाऱ्यांशी चर्चा
सडक अर्जुनी : येथील पंचायत समिती मधील कोट्यावधीचा घोळ करणाऱ्या बाबूकडून ३२ लाख रुपये जप्त करण्यात आले. ते शिक्षकांच्या जीपीएफ खात्यावर जमा करण्यात यावे. या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने खंडविकास अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
शिक्षकांच्या विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सडक अर्जुनीच्या पदाधिकाऱ्यांनी खंडविकास अधिकारी ए.आर.लोकरे यांच्या कक्षात जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी गटशिक्षणाधिकारी यू.एम. गौतम, कक्ष अधिकारी जनबंधू उपस्थित होते. नवनियुक्त खंडविकास अधिकारी ए.आर. लोकरे यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. जुनचे वेतन लिपीक वर्गाच्या लेखनी बंद आंदोलनामुळे रखडल्याने बँकेत वेतन पाठविण्याची व्यवस्था गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी राष्ट्रीयकृत बँकेतून करण्यात यावे, ४ टक्के शालिदवार रकमेचे बँकेतून परत आलेला धनादेश पुन्हा पाठवावे, पंचायत समितीतील भ्रष्टाचार प्रकरणात कामचुकारपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, शालेय पोषण आहाराचे मानधन देणे, निवड-श्रेवी-चटोपाध्याय प्रकरण जि.प.ला पाठविणे, शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय करुन देणे यावर चर्चा करण्यात आली.
चर्चेत किशोर डोंगरवार, पी.एन. बडोले, विरेंद्र वालोदे, जी.आर. गायकवाड, नरेश मेश्राम, विलास कोटांगले, एम.एस. डोंगरे, बी.जे. येरणे, जे.डी.मशाखेत्री, पी.एस गुप्ते, जे.व्ही. कराडे, आनंद मेश्राम, भास्कर नागपुरे, अरविंद कापगते, आर.बी. भुसारी, एच.पी. गहाणे, एकनाथ लंजे, भास्कर मुंगमोडे, डी.पी. पर्वते, घनश्याम पर्वते, पी.बी. शहारे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

शिक्षकांच्या पैशांसाठी न्यायालयात जाणार
सडक अर्जुनी येथील पंचायत समितीतून शिक्षकांचा पैसा अपहार करण्यात आला. दोषींवर कठोर कारवाई व्हावी व पैसा शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यात यावे. या संदर्भात पालकमंत्री राजकुमार बडोले, जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, विरोधी पक्षनेते गंगाधर परशुरामकर यांना निवेदन देण्यात आले आहे. शिक्षकांचा पैसा त्यांच्या खात्यात दोन महिन्यात जमा न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा किशोर डोंगरवार यांनी दिला आहे.

Web Title: Add it to the 32 million GPF seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.