अदानी वीज प्रकल्पाला पर्यावरण संवर्धनात पंचतारा मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 21:33 IST2018-04-12T21:33:36+5:302018-04-12T21:33:36+5:30
जिल्ह्यातील तिरोडा येथील अदानी विद्युत प्रकल्पाला पर्यावरण संवर्धनासाठी नुकतेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे पंचतारा मानांकन (फाईव्ह स्टार) देऊन गौरविण्यात आले. या प्रकल्पाने प्रदूषण कमी करुन पर्यावरणाचे संवर्धन केल्याबद्दल सलग दुसऱ्यांदा मानांकन प्राप्त केले आहे.

अदानी वीज प्रकल्पाला पर्यावरण संवर्धनात पंचतारा मानांकन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील तिरोडा येथील अदानी विद्युत प्रकल्पाला पर्यावरण संवर्धनासाठी नुकतेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे पंचतारा मानांकन (फाईव्ह स्टार) देऊन गौरविण्यात आले. या प्रकल्पाने प्रदूषण कमी करुन पर्यावरणाचे संवर्धन केल्याबद्दल सलग दुसऱ्यांदा मानांकन प्राप्त केले आहे.
तिरोडा येथे ३२०० मेगावॅट क्षमतेचा अदानी वीज प्रकल्प आहे. या प्रकल्पाने वीज निर्मिती करताना पर्यावरणाची हाणी होणार नाही. प्रकल्पातून निघणाºया राख आणि गॅसमुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन होणार नाही याची काळजी घेतली आहे. तसेच प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी प्रकल्पात विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. वीज निर्मिती दरम्यान प्रदूषणाच्या पातळीत वाढ होवू नये, याची प्रकल्पाने विशेष काळजी घेतली आहे. तसेच प्रकल्पातील राखेची योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था केली.
प्रदूषण विषयक नियमांचे काटेकोरपणे पालन केले. यासर्व गोष्टींचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नियमित सर्वेक्षण केले जाते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तपासणीत अदानी विद्युत प्रकल्पाने सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन व पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपाय योजना केल्याने सन २०१७-१८ या वर्षाकरिता या प्रकल्पाला पर्यावरण संवर्धनासाठी फाईव्हस्टार मानाकंन देण्यात आले. अदानी विद्युत प्रकल्पाने प्रदूषण कमी करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल व्यवस्थापनाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.