अदानी पॉवरला सर्वोत्तम सुरक्षा प्रणाली सन्मान
By Admin | Updated: May 9, 2015 23:58 IST2015-05-09T23:58:17+5:302015-05-09T23:58:17+5:30
अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडाला ३३०० मेगावाट थर्मल पॉवर प्लांट आॅपरेशन आणि मेंटेनन्स विभागामध्ये ...

अदानी पॉवरला सर्वोत्तम सुरक्षा प्रणाली सन्मान
सुरक्षा प्रणाली स्पर्धा : अदानीची निवड
गोंदिया : अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडाला ३३०० मेगावाट थर्मल पॉवर प्लांट आॅपरेशन आणि मेंटेनन्स विभागामध्ये सर्वाेत्कृष्ट सुरक्षा प्रणालीची अंमलबजावणी तसेच त्याला स्थायित्व प्रदान केल्याबद्दल सर्वोच्च सुरक्षा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.
अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेडच्यावतिने सुहास वाकोडकर, मनोज तिवारी (डेप्युटी मॅनेजर अग्निशमन आणि सुरक्षा विभाग) तसेच सुरक्षा अधिकारी भारत रामटेके अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडा यांनी पुरस्कार स्विकारला.
हा गौरव सर्वाेत्कृष्ट सुरक्षा प्रणाली स्पर्धा यामध्ये श्रेष्ठत्वाकरीता प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय सुरक्षा परिषद महाराष्ट्र विदर्भ विभागाद्वारे नागपूर येथे सर्वोत्तम सुरक्षा प्रणाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण ३१ संघटनांनी सहभाग घेतला होता व त्यामधून अदानी पॉवरची निवड करण्यात आली.
वाकोडकर यांनी अदानी थर्मल प्लांट तिरोडा येथे सर्वोत्कृष्ट सुरक्षा प्रणालीची कशाप्रकारे अंमलबजावणी केल्या जाते यावर पॉवर पाँईट द्वारा शोधपुर्ण सादरीकरण केले. स्टेशन हेड सी.पी. साहू, मुख्य आॅपरेशन्स आणि मेंटनन्स विभागाचे समीर मित्रा यांनी सुरक्षा चमूचे कौतूक केले व भविष्यामध्ये सुद्धा अशाप्रकारे सर्वोत्तं सुरक्षा प्रणालीची अंमलबजावणी कायम ठेवण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला. (शहर प्रतिनिधी)