अदानीने राबविले चिखली येथे स्वच्छ सुंदर भारत अभियान
By Admin | Updated: October 11, 2015 01:02 IST2015-10-11T01:02:52+5:302015-10-11T01:02:52+5:30
अदानी उद्योग समूहाच्या सामाजिक दायित्व पार पाडणाऱ्या अदानी फाऊंडेशन या शाखेच्या वतीने तिरोडा परिसरातील ग्रामीण विभागाच्या विकासाकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत.

अदानीने राबविले चिखली येथे स्वच्छ सुंदर भारत अभियान
गोंदिया : अदानी उद्योग समूहाच्या सामाजिक दायित्व पार पाडणाऱ्या अदानी फाऊंडेशन या शाखेच्या वतीने तिरोडा परिसरातील ग्रामीण विभागाच्या विकासाकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. अदानी फाऊंडेशन सोबतच अदानी पॉवर सुद्धा सामाजिक कार्यात रुची ठेवीत सुटीच्या दिवशी श्रमदान करुन गाव स्वच्छता मोहीम राबवून गावात स्वच्छतेविषयी जनजागृती करीत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ सुंदर भारत अभियानाला आॅक्टोबर २०१४ मध्ये सुरुवात केली. या अभियानाचा मुख्य उद्देश सन २०१९ पर्यंत संपूर्ण भारत स्वच्छ करायचा आहे. या उद्देशाची पूर्तता तेव्हाच साध्य होईल जेव्हा गावातील लोक या कार्याकरिता जागृत होऊन हातभार लावीत गाव स्वच्छ ठेवतील.
४ आॅक्टोबर रोज रविवारला सकाळी ७.२० वाजता अदानी पॉवरच्या मानव संसाधन विभागाने सामाजिक कार्याप्रती जाण ठेवून चिखली गावातील मुख्य रस्त्याचे स्वच्छता केली. यावेळी या विभागाचे आ. विजय रहांगडाले, अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडाचे मुख्य सी.पी. साहू, समीर मित्रा, बी.के. पांडे, संजीव मोहंती, अदानी फाऊंडेशन तिरोडाचे प्रकल्प समन्वयक सुबोध सिंग, सरपंच कैलास पटले, उपसरपंच दिलीप क्षीरसागर, कुलपत रहांगडाले व गावातील १०० च्यावर तरुण मंडळीनी हातात झाडू घेऊन संपूर्ण गावातील मुख्य रस्ते स्वच्छ केले.
चिखली गावाच्या मुख्य गेटपासून आ. विजय रहांगडाले, अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडाचे स्टेशनचे प्रमुख सी.पी. शाहू यांनी हातात झाडू घेऊन कार्यक्रमाचीे सुरुवात केली.
रस्ते स्वच्छ केल्यानंतर गावात ग्रामपंचायतीच्या पटांगणावर सभा घेण्यात आली.
यावेळी या सभेला संबोधित करतानी सी.पी. शाहू यांनी गावात दारूबंदी झाल्याचा आनंद व्यक्त केला. या परिसरातील युवकांनी खर्रा, गुटखा बंद करावे असे आवाहन करीत आपल्या गावात स्वच्छता राखण्यास सांगितले. जर आपल्या गावात स्वच्छता राहिली तर आपले आरोग्य सुदृढ होईल, आर्थिक स्थिती सबळ होईल, आपले गाव समृद्ध होईल असे मत व्यक्त केले.
सरपंच कैलास पटले यांनी अदानीने हे कार्यक्रम राबवून आमचे मनोधर्य वाढविले आहे. याबद्दल त्याचे आम्ही मनापासून आभार मानत असून आमचे गाव एक मॉडेल गाव होईल. राळेगण सिद्धी, हिवरे बाजार यांचे आदर्श लक्षात घेऊन आमचे गाव आदर्श करू असे आश्वासन देऊन कार्यक्रमाची सांगता केली. यात गावकऱ्यांनीही सहभाग घेतला. (तालुका प्रतिनिधी)