अदानी समूहाने कोविड केअर सेंटर सुरु करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:37 IST2021-04-30T04:37:04+5:302021-04-30T04:37:04+5:30
तिरोडा : तिरोडा शहरासह तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शहरात पूर्वीच आरोग्याची अपुरी सुविधा असल्याने रुग्णांना ...

अदानी समूहाने कोविड केअर सेंटर सुरु करावे
तिरोडा : तिरोडा शहरासह तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शहरात पूर्वीच आरोग्याची अपुरी सुविधा असल्याने रुग्णांना गोंदिया अथवा परजिल्ह्यात उपचारासाठी भटकावे लागत आहे. तेव्हा अदानी विद्युत प्रकल्पाने शहरात १०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करावे. रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी तिरोडा नगर परिषदेच्या नगरसेवकांनी केली आहे.
अदानी विद्युत प्रकल्प समूहाच्या वतीने सीएसआर योजनेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कामे करण्यात येत आहे. परंतु मागील महिन्याभरापासून कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने शहरासह तालुक्यात थैमान घातले आहे. शहरात पूर्वीच अपुरी आरोग्य व्यवस्था असल्याने कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. परिणामी अनेक रुग्णांचा जीवही गेला आहे. अदानी प्रकल्पाच्या वतीने गोंदिया शहरात सुविधा पुरविण्यात येत असल्या तरी ज्या तालुक्यात हा प्रकल्प आहे. त्या शहरातही सुविधा पुरविण्यात याव्या, यासाठी प्रकल्पाने सीएसआर फंडातून १०० बेड असलेले कोविड सेंटर व रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून पालिकेचे नगरसेवक अशोक असाटी, राजेश गुणेरिया, प्रभू असाटी, टरबेज मंसुरी, शीतलकुमार तिवडे यांनी केली आहे.