महासंपर्क अभियानातून कार्यकर्त्यांना सक्रिय करा
By Admin | Updated: July 20, 2015 01:26 IST2015-07-20T01:26:39+5:302015-07-20T01:26:39+5:30
देशात मोबाईल, इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. सदस्यता मोहिमेतून देशभरात ११ कोटी सदस्यांची नोंदणी झाली.

महासंपर्क अभियानातून कार्यकर्त्यांना सक्रिय करा
व्ही. सतीश : भाजपच्या बैठकीत केले आवाहन
गोंदिया : देशात मोबाईल, इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. सदस्यता मोहिमेतून देशभरात ११ कोटी सदस्यांची नोंदणी झाली. या सदस्यांना सक्रीय कार्यकर्ते करण्यासाठी महासंपर्क अभियान सुरू आहे. या अभियानाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन श्रमिक, शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी आदींचे सदस्यता फॉर्म भरून सर्व माहिती एकत्रित करा व त्यांना सक्रीय कार्यकर्ते करा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश यांनी केले.
गोंदिया येथे शुक्रवारी भारतीय जनता पक्षाची बैठक पार पडली. या वेळी ते मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल होते. बैठकीत प्रामुख्याने डॉ. उपेंद्र कोठेकर, जिल्हा महासंपर्क अभियान प्रमुख भेरसिंह नागपुरे, प्रदेश सचिव हरिश मोरे, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, माजी आ. हेमंत पटले, खोमेश रहांगडाले, भजनदास वैद्य, अशोक इंगळे, नेतराम कटरे, झामसिंग येरणे, संघटन मंत्री आशीष वांदिले, जि.प. सभापती कुसन घासले, प्रकाश गहाणे, सविता पुराम, मोरेश्वर कटरे, मदन पटले, जिल्हा महामंत्री संतोष चव्हाण, विरेंद्र अंजनकर, दीपक कदम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सीता रहांगडाले, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संजय कुळकर्णी आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, निवडणुकींमुळे महासंपर्क अभियानात खंड पडला असता तरी आता निवडणुकीचे यश-अपयश विसरून कामाला गती द्यायची आहे. जनतेच्या सेवेसाठी तत्परतेने कार्य करा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. जनधन योजनेतून १८ कोटी नागरिकांचे खाते सुरू करण्यात आले. बेटी पढाओ बेटी बचाओ, स्वच्छ भारत योजना, आंतरराष्ट्रीय योगा दिवस, प्रत्येक शाळेत शौचालय, एलपीजीची सबसिडी सोडण्याचा आग्रह आदी योजना सुरू केल्या. पाच वर्षे यशस्वी सरकार चालविण्याचा संकल्प आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सरकारसोबत मजबुतीने उभे राहून जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यायचा आहे, असे ते म्हणाले.
याप्रसंगी माजी विदर्भ संघटन मंत्री डॉ. कोठेकर यांनी, जिल्ह्यात सदस्य नोंदणी अभियानात विक्रमी नोंदणी केली आहे. महासंपर्क अभियानात सर्व सदस्यांना पक्षाचा क्रियाशील सदस्य बनविण्याकरिता भेट घ्यायची असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी आपल्या प्रास्ताविकेत निवडणुकीत मिळालेल्या अपयशाने खचून न जात जनतेचे काम करून संघटनेला मजबूत करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी महासंपर्क अभियानात मंडळ स्तरावर अभियान प्रमुखांची घोषणा करण्यात आली. यात गोंदिया शहर प्रमुख संजय कुलकर्णी, पंकज सोनवाने, ग्रामीण मंडळ प्रमुख छत्रपाल तुरकर, छाया दसरे, अशोक हरिणखेडे, तिरोडा शहर अनुप बोपचे, तिरोडा ग्रामीण भाऊराव कठाणे, भुमेश्वरी बघेले, गोरेगाव मंडळ मोरेश्वर कटरे, चित्रलेखा चौधरी, सडक-अर्जुनी मंडळ लक्ष्मीकांत धानगाये, रूपाली टेंभुर्णे, अंजली देशमुख, अर्जुनी-मोरगाव मंडळ लायकराम भेंडारकर, मंदा कुंभरे, देवरी मंडळ लक्ष्मण सोनसर्वे, नूतन कोवे, सालेकसा मंडळ परसराम फडे, प्रतिभा परिहार यांचा समावेश आहे.
संचालन जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर यांनी केले. बैठकीला जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, पंचायत समिती सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषद सदस्य, मंडळ अध्यक्ष, महामंत्री, आघाडी अध्यक्ष, महामंत्री, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढलेले सर्व उमेदवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सर्वाधिक मते भाजपला
जि.प. व पं.स. निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नाही. मात्र सर्वात जास्त मते प्राप्त झाली असून हा जनतेचा पक्षावरील विश्वास आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत १७ कोटी जनतेची आपल्याला मते मिळाली होती. ११ कोटी लोकांना आपण सदस्य केले. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून आपल्या पक्षाला बहुमान मिळाला आहे. त्या सर्व लोकांपर्यंत पोहचून त्यांच्याशी संपर्क करून त्यांना पक्षाची ध्येय-धोरणे सांगून सक्रीय कार्यकर्ते करण्याचे आवाहन व्ही. सतीश यांनी केले.