रोजगार सेवकावर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2017 00:49 IST2017-05-01T00:49:59+5:302017-05-01T00:49:59+5:30
तालुक्यातील ग्राम बघोली येथील मनरेगा अंतर्गत पांदन रस्ता बांधकामावर नसलेल्या मजुरांची नावे दाखवून

रोजगार सेवकावर होणार कारवाई
उप मुकाअंनी दिले आदेश : बघोली येथे मनरेगाच्या कामात भ्रष्टाचार
गोरेगाव : तालुक्यातील ग्राम बघोली येथील मनरेगा अंतर्गत पांदन रस्ता बांधकामावर नसलेल्या मजुरांची नावे दाखवून पैशाची उचल व मजुरांकडून पैशाची वसुली चौकशीत सिद्ध झाल्याने ग्रामरोजगार सेवकावर कारवाई करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा) यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.
बघोली येथे मे २०१६ मध्ये पांदन रस्ता तयार करण्यात आला. शेतकऱ्यांची परवानगी न घेता ७ शेतकऱ्यांच्या शेतातून नवीनच पांदन रस्ता तयार करण्यात आला. यात कामावर न जाणाऱ्या अनेक मजुरांची नावे घालून शासनाच्या निधीची अफरातफर करण्यात आली. स्थानिक ग्रामरोजगार सेवक हिरालाल रामचंद्र बळगे यांनी अंगणवाडी मदतनिस प्रेमकला मेश्राम हिचे नाव कामावर दाखवून सात हजार ३१४ रुपये तिच्या खात्यात जमा होताच तिला ती रक्कम परत ही मागीतली. अशाच प्रकारे त्यांच्यासह इतर अनेकांनी रक्कम परत दिली. यावर शेतकऱ्यांनी काम बंद करण्यासाठी तक्रार दाखल केली होती.
अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्यासहमतीने काम चालू असल्याचे लक्षात येताच शेतकरी रुपंद पटले यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली असता कार्यवाही शुन्य आहे म्हणून राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी उच्च अधिकाऱ्यांना पत्र देवून चौकशीचे आदेश दिले. पं.स. च्या विभागाकडून चौकशी करण्यात आली. पण चौकशी अहवालात दिरंगाईमुळे प्रकरण जवळ जवळ ११ महिने प्रलंबित राहिले. पण तक्रारकर्ते रुपचंद पटले व त्यांच्या साथीदारांनी हार न मानता शासनाच्या कामात झालेला भ्रष्टाचार खोदून काढला निधीचा दुरुपयोग शासनाच्या नजरेस आणून दिला. अखेर पं.स.च्या २९ आॅगस्टच्या अहवालानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या अंतीम चौकशीत ग्रामरोजगार सेवक बळगे यांनी अंगणवाडी मदतनीस पे्रमकला मेश्राम यांचे नाव मस्टरवर घेवून बँक खात्यात जमा के लेली रक्कम परतही घेतली असे बयानावरुन सिद्ध झाले.
या अहवालानुसार ग्रामरोजगार सेवक बळगे यांनी आपल्या कामात कसूर केला व शासकीय निधीचा दुरूपयोग केला. सदर रक्कम ग्रामसेवक बळगे यांच्याकडून वसूल करुन मग्रारोहयोच्या पं.स. मधील शासकीय खात्यात जमा करावी व त्याचेविरुद्ध कार्यवाहीचे प्रस्ताव ग्रामसभेत ठेवून निर्णय घ्यावा व तसे संबंधित कार्यालयास कळवावे असे आदेश उप मुकाअ यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले. (शहर प्रतिनिधी)