‘त्या’ दोषींवर कारवाई होणार

By Admin | Updated: August 25, 2015 02:24 IST2015-08-25T02:24:59+5:302015-08-25T02:24:59+5:30

तालुक्यातील सोनारटोला येथील शाळकरी १८ वर्षीय युवती आरती रवींद्र बारसे हत्याकांड प्रकरणाची चौकशी करण्याकरिता

Action will be taken against those 'guilty' | ‘त्या’ दोषींवर कारवाई होणार

‘त्या’ दोषींवर कारवाई होणार

देवरी : तालुक्यातील सोनारटोला येथील शाळकरी १८ वर्षीय युवती आरती रवींद्र बारसे हत्याकांड प्रकरणाची चौकशी करण्याकरिता व मृतक युवतीच्या कुटुंबीयांना सांत्वना देण्याकरिता क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी रविवारी बारसे कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच घटनास्थळावर सालेकसा येथील ठाणेदारांना बोलावून त्यांंना या घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.
यावेळी मृतक आरतीचे वडील, काका व मामा यांनी आमदारांना घटनेची विस्तृत माहिती दिली व घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या निवेदनात संपूर्ण गावकऱ्यांनी गावातीलच आरोपी योगराज हेमराज चकोले याच्यावर आरोप करीत त्याला त्वरित कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सहा महिन्यापूर्वी योगराजने या युवतीसोबत छेडखानी केली होती. त्यासंबंधी सालेकसा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी १०० रूपयांच्या मुद्रांकावर मुलाकडून लिहून घेऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी योगराज तंटामुक्त समितीचा अध्यक्ष होता. त्यानंतरही योगराज आरतीला वारंवार त्रास देत होता. १८ आॅगस्टला तिला घरात एकटे पाहून योगराजनेच आपल्या सहकाऱ्यांसोबत आरतीची हत्या करून तिला विहिरीत फेकल्याचा आरोप व तो गावकऱ्यांना मदतही करीत नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. . (प्रतिनिधी)

चक्काजाम
आंदोलनाचा इशारा
४सदर हत्याकांडातील आरोपी गावातीलच असून त्याच्यावर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आरोपीवर कारवाई करून मृत मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी. आरोपीवर कठोर कारवाई त्वरित न केल्यास गावकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Action will be taken against those 'guilty'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.