जुन्या नोटांनी भरलेल्या ट्रकवर आरटीओची कारवाई

By Admin | Updated: December 22, 2016 01:09 IST2016-12-22T01:09:53+5:302016-12-22T01:09:53+5:30

भिलाईवरुन नागपूर रिझर्व बँकेत अब्जावधी रुपयाची रोकड घेऊन जाणाऱ्या अतिरिक्त भारक्षमतेच्या वाहनावर ....

The action taken by RTO on the old note-filled truck | जुन्या नोटांनी भरलेल्या ट्रकवर आरटीओची कारवाई

जुन्या नोटांनी भरलेल्या ट्रकवर आरटीओची कारवाई

रिझर्व्ह बँकेचा पैसा : वजन जास्त असल्यामुळे झाली कारवाई

देवरी : भिलाईवरुन नागपूर रिझर्व बँकेत अब्जावधी रुपयाची रोकड घेऊन जाणाऱ्या अतिरिक्त भारक्षमतेच्या वाहनावर मंगळवारी दुपारी देवरी सिमा तपासणी नाक्यावर कारवाई करण्यात आली. सदर कारवाई वाहन निरीक्षक आनंद मोड यांनी केल्याने बँक प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
५०० व हजार रुपयाच्या जून्या नोटांनी भरलेला ट्रक क्रमांक एमएच ४० वाय ०६७३ मंगळवारी दुपारी २ च्या दरम्यान देवरी सीमा तपासणी नाक्यावर पोहोचला. तेथील काट्य़ावर गाडी पोहोचताच त्यात पाच टन अतिरिक्त भार असल्याने तेथे कार्यरत वाहन निरीक्षक यांनी नियमानुसार वाहनावर कारवाई केली. पाच टन भार असल्याने ३० हजार रुपये दंड वाहनाकडून आकारण्यात आला.
वाहन निरीक्षक आनंद मोड यांनी दिलेल्या माहितीनुसार मोटर वाहन कायदा १९९८ च्या कलम ११३, ११४ नुसार अतिरिक्त भारक्षमता असल्याने या वाहनावर कारवाई करण्यात आली आहे. नियमानुसार अतिरिक्त भार दुसऱ्या वाहनात क्रांसींग केल्याशिवाय व दंड भरल्याशिवाय या वाहनाला सोडता येणार नाही.
सध्या या वाहनात अब्जावधींची रक्कम असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने देवरी पोलीस स्टेशनमध्ये वाहन जमा करण्यात आले आहे.
दुसरीकडे या वाहनासोबत सुरक्षा कर्मचारी व बँक कर्मचारी असल्याने त्यांनी भिलाई ते नागपूरच्या बँक अधिकाऱ्यांनी वाहन निरीक्षकांना वाहन सोडण्याची विनंती केली. परंतु नियमानुसारच वाहन सोडणार अशी भूमिका वाहन निरीक्षक आनंद मोड यांनी घेतल्याने बँक प्रशासनात एकच खळबळ माजली होती. उच्च अधिकाऱ्यांचे फोन आल्यावर दंड आकारून त्या वाहनाला सोडण्यात आले. १६२०० टन क्षमतेची परवानगी असताना या वाहनाचे वजन २१२०० होते. (प्रतिनिधी)
 

Web Title: The action taken by RTO on the old note-filled truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.