तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या ७ जणांवर कारवाई ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:49 IST2021-02-05T07:49:47+5:302021-02-05T07:49:47+5:30

गोंदिया : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असतानाही त्यांची विक्री करणाऱ्या ७ पानटपरीचालकांवर तंबाखू नियंत्रण पथकाकडून कारवाई करण्यात ...

Action taken against 7 persons selling tobacco products () | तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या ७ जणांवर कारवाई ()

तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या ७ जणांवर कारवाई ()

गोंदिया : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असतानाही त्यांची विक्री करणाऱ्या ७ पानटपरीचालकांवर तंबाखू नियंत्रण पथकाकडून कारवाई करण्यात आली. पथकाने गुरुवारी (दि.२८) डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत सडक-अर्जुनी व कोहमार येथे विशेष धाडसत्र राबविले.

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने जीवघेणे आजार होतात. यामुळे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर कोटपा कायदा २००३ अंतर्गत कलम ४ नुसार सार्वजनिक क्षेत्रात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर बंदी, कलम ५ नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी असून, कलम ६ (अ) नुसार अल्पवयीन व्यक्तीस तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे दंडनीय गुन्हा आहे. याशिवाय अन्य कलमांतर्गत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांबाबत निर्देश देण्यात आले आहेत. मात्र यासर्व बाबींकडे दुर्लक्ष करून पानटपऱ्या व अन्य दुकानदार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत आहेत. तंबाखू नियंत्रण पथकाने गुरुवारी (दि.२८) डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत सडक-अर्जुनी व कोहमारा येथील २० पानटपऱ्यांवर धाडी घालून पाहणी केली. यामध्ये ७ पानटपऱ्यांमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ मिळून आल्याने त्यांच्यावर कलम ४, ५, ६ (अ) अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी व सल्लागार डॉ. अनिल आटे, मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर, तार्केश उकेस, विवेकानंद कोरे, पोलीस नाईक घनश्याम उईके व गृहरक्षक नेमराज कुरसुंगे यांनी केली.

Web Title: Action taken against 7 persons selling tobacco products ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.