केशोरी पोलिसांच्या ॲक्शन मोडमुळे रस्ते झाले निर्मनुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:31 IST2021-04-23T04:31:25+5:302021-04-23T04:31:25+5:30
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी कनेरी येथे कोरोना विषाणूचा झालेला विस्फोट लक्षात घेऊन कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी तालुका प्रशासनाने कंटोन्मेंट झोन निर्माण ...

केशोरी पोलिसांच्या ॲक्शन मोडमुळे रस्ते झाले निर्मनुष्य
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी कनेरी येथे कोरोना विषाणूचा झालेला विस्फोट लक्षात घेऊन कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी तालुका प्रशासनाने कंटोन्मेंट झोन निर्माण करून केशोरी येथे येण्या-जाण्यासाठी रस्ते बंद करून कलम १४४ लागू करून या सर्व बाबीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी येथील पोलीस स्टेशनवर देण्यात आली आहे. त्यामुळे येथील ठाणेदार संदीप इंगळे यांनी ग्रामपंचायतच्या सहयोगाने सुनियोजित संचारबंदीवर आळा घालण्यासाठी नियोजनबध्द आखणी करून पोलीस उपनिरीक्षक बाबू मुंडे यांचे पोलीस पथक येथील मुख्य रस्त्यावर कार्यरत असल्याने विनाकारण फिरणाऱ्या आणि विनामास्क लावणाऱ्या नागरिकांना याचा चांगलाच फटका लागल्याचे सांगण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा विशिष्ट वेळेपुरतेच सुरू ठेवण्याची अट देऊन, भाजीपाला इत्यादी सेवा घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे मात्र केशोरी येथील रस्ते सुनसान होऊन निर्मनुष्य झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलिसांच्या ॲक्शन मोडचे नागरिकांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले जात आहे.