गोंदिया : बलात्कार प्रकरणात नाशिक पोलिसांनी अशोक खरात या ज्योतिषाला अटक केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासोबतचे अशोक खरातचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेनंतर राज्यातील विविध नेत्यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. याप्रकरणी रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली जात आहे.
यावर राष्ट्रवादी (अजित पवार)चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल यांनी या प्रकरणाशी पक्षाच्या ज्या व्यक्तींची नावे जोडली आहेत त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल असे माध्यमांशी बोलतांना सांगितले.
खा. प्रफुल्ल पटेल हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी (दि.२०) त्यांनी माध्यमांसह संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. खा. पटेल म्हणाले भोंदूबाबाचे जे काही प्रकार आहेत ते अतिशय वाईट आहे आणि घाणेरडा आहे. अशा प्रकारांना आणि प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचे समाजावरसुद्धा वाईट परिणाम होऊ शकतात. अशोक खरात यांच्यासारख्या प्रवृत्तीवर निश्चित योग्य कारवाई केली जाईल. तसेच जे लोक त्यांच्यासोबत आहेत त्यांच्यावरसुद्धा सक्तीने कारवाई करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे काही राजकीय नेत्यांचे नावसुद्धा या प्रकरणाशी जोडली गेली आहेत. त्यांच्यावरसुद्धा आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य ती कार्यवाही करणार आहोत. ते येणाऱ्या काळात आपल्या सर्वांना दिसेलच असे खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
Web Summary : NCP's Praful Patel assures action against party members and politicians linked to astrologer Ashok Kharat's case. He condemned Kharat's actions and stressed the need to curb such tendencies to prevent negative societal impact.
Web Summary : एनसीपी के प्रफुल्ल पटेल ने ज्योतिषी अशोक खरात के मामले से जुड़े पार्टी सदस्यों और नेताओं के खिलाफ कार्रवाई का आश्वासन दिया। उन्होंने खरात के कृत्यों की निंदा की और नकारात्मक सामाजिक प्रभाव को रोकने के लिए ऐसी प्रवृत्तियों पर अंकुश लगाने की आवश्यकता पर बल दिया।