काळ्या-निळ्या काचा लावणाऱ्या ९२ वाहनांवर कारवाई
By Admin | Updated: November 8, 2014 01:23 IST2014-11-08T01:23:22+5:302014-11-08T01:23:22+5:30
दिल्लीच्या निर्भया प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने चारचाकी वाहनावरील काळ्या व निळ्या काचांना बंदी घातली.

काळ्या-निळ्या काचा लावणाऱ्या ९२ वाहनांवर कारवाई
गोंदिया : दिल्लीच्या निर्भया प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने चारचाकी वाहनावरील काळ्या व निळ्या काचांना बंदी घातली. तरी देखील अनेक चारचाकी वाहनावर काळ्या व निळ्या काचा लावून शहरात सर्रास वाहने चालविले जातात. या वाहनातून एखाद्या तरुणीला घेऊन गेले तरी कळणार नाही. या प्रकारामुळे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता असल्याचे पाहून गोंदिया उपविभागीय कार्यालयांतर्गत विशेष मोहीम राबवून काळ्या व निळ्या काचा लावणाऱ्या ९२ वाहनांवर गुरूवारी कारवाई करण्यात आली.
गोंदिया उपविभागीय अधिकारी अशोक नखाते यांच्या नेतृत्वात गोंदिया शहर, गोंदिया ग्रामीण, रामनगर, रावणवाडी, वाहतुक नियंत्रण शाखेतर्फे गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत ४१३ वाहनाची तपासणी करण्यात आली. यात ९२ वाहनावर काळ्या व निळ्या काचा आढळल्या. त्या काचा उतरवून घेण्यात आले. या मोहिमेसाठी प्रत्येक नाकाबंदी पार्इंटवर एक पोलीस हवालदार, चार पोलीस कर्मचारी व एक वाहतूक पोलीस शाखेचा कर्मचारी लावण्यात आला होता. गोंदिया शहर पोलिसांनी फुलचूर नाका येथे नाकाबंदी केली. येथे एकूण ९० वाहने तपासण्यात आले. त्यात ८ वाहनांवर काळ्या व निळ्या काचा लावल्याचे आढळले. या वाहनचालकाकडून प्रत्येकी १०० रुपये प्रमाणे ८०० रुपये, अवैध प्रवासी एक प्रकरणे व इतर चार प्रकरणे नोंदविण्यात आले. एकूण १ हजार ३०० रुपये दंड या वाहनाना करण्यात आला आहे. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी खमारी नाका येथे नाकाबंदी केली. येथे एकूण ५० वाहने तपासण्यात आले. त्यात ११ वाहनांवर काळ्या व निळ्या काचा लावल्याचे आढळले. या वाहनचालकाकडून प्रत्येकी १०० रुपये प्रमाणे ११०० रुपये, एकूण १ हजार १०० रुपये दंड या वाहनाना करण्यात आला आहे.
रामनगर पोलिसांनी कुडवा नाका येथे नाकाबंदी केली. येथे एकूण ५४ वाहने तपासण्यात आले. त्यात १४ वाहनांवर काळ्या व निळ्या काचा लावल्याचे आढळले. या वाहनचालकाकडून प्रत्येकी १०० रुपये प्रमाणे १४०० रुपये, अवैध प्रवासी दोन प्रकरणे व इतर तीन प्रकरणे नोंदविण्यात आले. एकूण २ हजार ९०० रुपये दंड या वाहनाना करण्यात आला आहे. रावणवाडी पोलिसांनी त्रिमूर्ती चौक कोरणी नाका येथे नाकाबंदी केली. येथे एकूण ६९ वाहने तपासण्यात आले. त्यात ६ वाहनांवर काळ्या व निळ्या काचा लावल्याचे आढळले. या वाहनचालकाकडून प्रत्येकी १०० रुपये प्रमाणे ६०० रुपये, अवैध प्रवासी दोन प्रकरणे व इतर १३ प्रकरणे नोंदविण्यात आले. एकूण ३ हजार रुपये दंड या वाहनाना करण्यात आला आहे.
वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे ढिमरटोली चौक, मरारटोली टी पार्इंट, फुलचूर नाका व मार्केट नाकाबंदी केली. येथे एकूण १५० वाहने तपासण्यात आले. त्यात ५३ वाहनांवर काळ्या व निळ्या काचा लावल्याचे आढळले. या वाहनचालकाकडून प्रत्येकी १०० रुपये प्रमाणे ५ हजार ३०० रुपये, अवैध प्रवासी सात प्रकरणे व इतर ३६ प्रकरणे नोंदविण्यात आले. एकूण १३ हजार ३०० रुपये दंड या वाहनाना करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)