६० वर्ष जुन्या झाडाची कटाई करणाऱ्यावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:27 IST2018-03-13T00:27:40+5:302018-03-13T00:27:40+5:30
देवरी येथील एका ६० वर्षीय वृक्षाची कटाई करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर वन विभागाने आरोपपत्र दाखल केले आहे.

६० वर्ष जुन्या झाडाची कटाई करणाऱ्यावर कारवाई
आॅनलाईन लोकमत
देवरी : देवरी येथील एका ६० वर्षीय वृक्षाची कटाई करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर वन विभागाने आरोपपत्र दाखल केले आहे.
जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे हे देवरी तालुक्याच्या दौऱ्यावर गेले असता त्यांची नजर नॅशनल हायवेवरील मरामजोब या गावी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जुन्या झाडावर नजर पडली. त्यांनी या झाडाजवळ जावून पाहणी केली असताना या झाडाची कटाई करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आढळले. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच याची चौकशी करुन झाडाची कटाई करणाºयावर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश् तहसीलदार विजय बोरुडे व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तहसीलदारांनी वनविभागाच्या अधिकाºयांना आदेश देवून व आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला.
बलदेव जयराम राऊत असे या झाडाची कटाई करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याची कबुली देखील त्यांनी तहसीलदारांपुढे दिली. आता त्याच्यावर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) व २७ (१) अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकारामुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्या वचक बसणार आहे.