विनाकारण फिरणाऱ्या ४३ वाहन चालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST2020-04-21T05:00:00+5:302020-04-21T05:00:13+5:30
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानी वाढत आहे. राज्यात कोरोना विषाणू बाधित रूग्णांची संख्या दिवसादिवस वाढत आहे.जिवघेण्या संसर्गजन्य कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी मागील २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आली आहे.

विनाकारण फिरणाऱ्या ४३ वाहन चालकांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी शासन स्तरावरून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असताना सुद्धा काही नागरिक मुद्दामपणे घराबाहेर पडून रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसतात. अशा विनाकारण फिरणाºया वाहन चालकांना चाप बसावा म्हणून अर्जुनी मोरगाव पोलिसांनी रविवारी (दि.१९) ४३ मोटरसायकल, वाहन जप्त करून वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून २ हजार ६०० रूपयाचा दंड वसूल केला.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानी वाढत आहे. राज्यात कोरोना विषाणू बाधित रूग्णांची संख्या दिवसादिवस वाढत आहे.जिवघेण्या संसर्गजन्य कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी मागील २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आली आहे. अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत लॉकडाऊनचे पालन नागरिकांकडून होण्याच्या दृष्टिने जनजागृती करण्यात येत आहे.
जनतेनी घराबाहेर पडु नये असे वारंवार पोलीस विभागाकडून सांगितले जात असले तरी काहीजण विनाकारण क्षुल्लक कारण सांगून मोटारसायकलने रस्त्यावर फिरताना दिसतात.रस्त्यावर निघणाºया वाहन चालकांवर वचक बसावा यासाठी रविवारला नाकाबंदी करण्यात आली.
वाहन चालकांना थांबवून विचारपूस केली. ४३ मोटरसायकल वाहन चालक विनाकारण फिरत असल्याचे आढळले. त्यांच्यावर मोवाका कलम २०७ अन्वये वाहने ताब्यात घेण्यात आले. त्यातील १३ वाहनांवर मोवाका अन्वये कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. ताब्यात घेतलेले इतर वाहन कागजपत्रांची पुर्तता केल्यानंतर यापुढे घराबाहेर पडू नका अशी ताकीद देऊन वाहने सोडण्यात आली.
लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशांत भुते, पोलिस उपनिरीक्षक देवीदास शेवाळे, अशोक अवचार, सहायक पोलीस उपनिरीक्षक माणिक खरकाटे,राहुल चिचमलकर, श्रीकांत मेश्राम, पोलीस विभाग प्रयत्नशील आहेत.