विविध ठिकाणी १७ दारू विक्रेत्यांवर कारवाई
By Admin | Updated: April 23, 2015 00:33 IST2015-04-23T00:33:52+5:302015-04-23T00:33:52+5:30
गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी १७ दारू विक्रेत्यांवर कारवाई करून शेकडो नगर दारूचे पव्वे जप्त करण्यात आले.

विविध ठिकाणी १७ दारू विक्रेत्यांवर कारवाई
गोंदिया : गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी १७ दारू विक्रेत्यांवर कारवाई करून शेकडो नगर दारूचे पव्वे जप्त करण्यात आले.
अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चापटी येथील सुंदरलाल गोपाल मानकर (३५) याच्याकडून १८ देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले. शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या झुलचूर येथील परमानंद चरणदास बोरकर (५४) याच्याकडून ५ नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले.आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गांधी चौकातील रोशन भोलाराम देवांगण (३२) याच्याकडून प्रताप पेट्रोल पंपावरून ६ नग देशी दारूचे पव्वे जपत करण्यात आले.
दवनीवाडा पोलिसांनी भरतलाल खेत्री भांडारकर (५२) याच्याकडून ५३ लीटर माहेफुलाची दारू जप्त करण्यात आली. गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सेजगावकला येथून नेतलाल मंगलदास मालाधारी (५४) यांच्याकडून ३१ नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले.
गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कटंगटोला येथील फुलचंद उके (४०) याच्याकडून १८ नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले.
तिरोडा पोलिसांनी संत रविदास वॉर्ड तिरोडा येथील ईश्वर मदन बरईकर (३०) याच्याकडून ९६ किलो मोहफुल व २० लीटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आले.दिनेश घनश्याम बरईकर (२६) याच्याकडून १८० किलो मोहफुल व दारू असा एकूण १२ हजार ६५० रूपयाचा माल जप्त करण्यात आला. संत रविदास वॉर्डातील भीमराव उर्फ भीमू श्रीराम झाडे (३०) याच्याकडून १४० किलो माहेफुल जप्त करण्यात आला. नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रेलटोली येथून सोमवारी दारु जप्त करण्यात आली.
डुग्गीापार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या डव्वाच्या दीपकनगरातील मालन किसन सोनवाने (४५) याच्याकडून ५ नग देशी दारू जप्त करण्यात आली.किशनपूर येथील शोभेलाल दिगांबर सलामे (३०) याच्याकडून ३ नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले. घाटबोरी येथील विजय दवना मेश्राम (३५) याच्याकडून १० नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले.
गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मोहगाव येथील बळीराम दुर्जन गजभिये (५०) याच्याकडून २५ नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले. सालेकसा पोलिसांनी पुराडा येथील भोजराज यादेराव डोमळे (४७) याच्याजवळून ४ नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले.
टेकडीटोला येथील पतीराम लटारू सुलाखे (४५) याच्याकडून ८ देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले. चंद्रपूरच्या बापूपेठ वॉर्ड क्र. ३ येथील सचिन मुकुंदा राऊत (२७) याच्याकडून अर्जुनी-मोरगाव येथे १९ देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले. चंद्रपूरच्या मूल येथील पुरूषोत्तम डोमाजी नैताम (३०) याच्याकडून ४५ नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)