बलात्कार प्रकरणातील आरोपीला १० वर्षाचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:21 IST2021-07-01T04:21:11+5:302021-07-01T04:21:11+5:30

गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ३ सप्टेंबर २०१५ रोजी दुपारी १ वाजता बळजबरी करणाऱ्या ...

Accused in rape case sentenced to 10 years imprisonment | बलात्कार प्रकरणातील आरोपीला १० वर्षाचा कारावास

बलात्कार प्रकरणातील आरोपीला १० वर्षाचा कारावास

गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ३ सप्टेंबर २०१५ रोजी दुपारी १ वाजता बळजबरी करणाऱ्या नराधमाला गोंदियाच्या विशेष जलदगती न्यायालयाने ३० जून रोजी आरोपीला १० वर्षाचा साधा कारावास व ५ हजार रुपये दंड ठोठावला आहे.

प्रदीप संभा जुगनाके (५३) रा. महागाव असे आरोपीचे नाव आहे. ८ व्या वर्गातील पीडितेला आपल्या घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणात अर्जुनी मोरगाव पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ (२) (जे) (एल) अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास तपासी अधिकारी राजेश गज्जल यांनी केला होता. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश शुभदा तुळणकर यांनी ३० जून रोजी विशेष जलदगती न्यायालयात केली आहे. कलम ३७६ (जे) व बाललैंगिक अत्याचार अधिनियम कलम ४ अन्वये आरोपीला १० वर्षाचा कारावास व ५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणात सरकारी पक्षाने १३ साक्षीदार तपासले. पीडितेची बाजू विशेष सरकारी वकील ॲड. कृष्णा पारधी यांनी मांडली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात पैरवी अधिकारी गीता ठाकूर यांनी काम पाहिले.

Web Title: Accused in rape case sentenced to 10 years imprisonment