घोरपडीची शिकार करणारे आरोपी जाळयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 05:00 IST2020-09-07T05:00:00+5:302020-09-07T05:00:25+5:30
खत मारणारे मजूर यादोराव सुदाम राऊत (४०) व सेवक सुदाम कापगते (४०) राहणार नवेगावबांध यांनी या दोघांनी घोरपडीची शिकार केली. खत शेतात नेण्यासाठी मुलचंद गुप्ता यांच्या मालकीचे किरायाने घेतलेल्या ट्रॅक्टर ट्रॅलीत ठेवली. याबाबतची माहिती विशेष व्याघ्र संरक्षण दलाला मिळाली. या दलाचे मुसळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या अवैध शिकारीचा पंचनामा करून हे प्रकरण वन विभाग प्रादेशिकच्या हद्दीत येत असल्यामुळे त्यांनी हे प्रकरण वन विभागाकडे सोपविले.

घोरपडीची शिकार करणारे आरोपी जाळयात
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : घोरपडीची अवैध शिकार केल्याप्रकणी वन विभागाने दोन जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई ४ सप्टेंबर रोजी करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार ४ सप्टेंबर रोजी तिमांडे नामक इसमाच्या शेतात धान पिकाला खत देत असताना, शेतामध्ये एक मोठी घोरपड आढळली. खत मारणारे मजूर यादोराव सुदाम राऊत (४०) व सेवक सुदाम कापगते (४०) राहणार नवेगावबांध यांनी या दोघांनी घोरपडीची शिकार केली. खत शेतात नेण्यासाठी मुलचंद गुप्ता यांच्या मालकीचे किरायाने घेतलेल्या ट्रॅक्टर ट्रॅलीत ठेवली. याबाबतची माहिती विशेष व्याघ्र संरक्षण दलाला मिळाली. या दलाचे मुसळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या अवैध शिकारीचा पंचनामा करून हे प्रकरण वन विभाग प्रादेशिकच्या हद्दीत येत असल्यामुळे त्यांनी हे प्रकरण वन विभागाकडे सोपविले. वनपरिक्षेत्रधिकारी रोशन दोनोडे, वनरक्षक मिथुन चव्हाण, विजय येरपुडे, आर.एम.सूर्यवंशी, ए.एच.चौबे यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी यादोराव सुदाम राऊत व सेवक सुदाम कापगते यांच्यावर अवैधरित्या घोरपड शिकार केल्याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम २,२(१६)(अ),९,३९,५०(१) अन्वये गुन्हा नोंदवून, त्यांना अटक केली. ५ सप्टेंबरला न्यायालयात सादर केले. न्यायालयाने आरोपींना ७ सप्टेंबरपर्यंत वन कोठडी दिली आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी दोनोडे करीत आहेत.