इसमाला शिवीगाळ दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2017 00:16 IST2017-01-16T00:16:37+5:302017-01-16T00:16:37+5:30

दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुरदाडा येथे शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता झालेल्या वादात दोन गटात मारहाम झाली

The accused filed a complaint against Shivvili | इसमाला शिवीगाळ दोघांवर गुन्हा दाखल

इसमाला शिवीगाळ दोघांवर गुन्हा दाखल

गोंदिया : दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुरदाडा येथे शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता झालेल्या वादात दोन गटात मारहाम झाली असून याप्रकरणात दोन्ही गटातील सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणात, राजेश नंदूसाव काजीदार (३४) यांना आरोपी मंत्रीलाल भोजलाल जगणे (४०) व राजा मंत्रीलाल जगणे (२०) या दोघांनी चहा व कॉफी योग्य नाही या कारणावरून त्यांच्यासोबत भांडण करून ठार करण्याची धमकी दिली. प्रकरणी राजेश काजीदार यांच्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द दवनीवाडा पोलिसांनी भादंविच्या कलम २९४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तर याच प्रकरणात मंत्रीलाल जगणे यांना आरोपी निरज परमानंद उपवंशी (३०), परमानंद भाऊलाल उपवंशी (६२), राहुल रमाकांत उपवंशी (२९), संदीप शिवशंकर उपवंशी (३४) व राजेश नंदूसाव काजीदार (३४) यांनी मारहाण करुन दुखापत केली. त्याच्याविरूध्द भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ४५२, ३२३ अन्वये दवनीवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
 

Web Title: The accused filed a complaint against Shivvili