पर्यटन स्थळाचा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनविल्याचा आरोप

By Admin | Updated: November 14, 2016 00:29 IST2016-11-14T00:29:20+5:302016-11-14T00:29:20+5:30

पर्यटनस्थळ चोरखमारा शिव मंदिर तसेच पर्यटन स्थळ बोदलकसा रेस्ट हाऊस येथील सिमेंट क्रांक्रिट रस्त्याचे

The accusations of making the road of tourist spot a bad quality | पर्यटन स्थळाचा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनविल्याचा आरोप

पर्यटन स्थळाचा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनविल्याचा आरोप

पत्रकार परिषद : हिरामन बावनकर यांची माहिती
तिरोडा : पर्यटनस्थळ चोरखमारा शिव मंदिर तसेच पर्यटन स्थळ बोदलकसा रेस्ट हाऊस येथील सिमेंट क्रांक्रिट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. एक बॅग सिमेंटमध्ये २५ घमेले रेती व १५ घमेले गिट्टी वापरुन बनविण्यात आले आहे, असा आरोप हिरामन बावनकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
चोरखमारा पर्यटनस्थळ शिवमंदिर येथील सिमेंट क्रांक्रिटचा रस्त्याची अंदाजे किंमत नऊ लाख ९९ हजार ७३१ रुपये तर बोदलकसा पर्यटन स्थळ रेस्ट हाऊस येथील सिमेंट-कांक्रिटचा रस्ता नऊ लाख ९९ हजार २६४ रूपयांचा खर्च आहे.
सदर दोन्ही कामांचे सुरू करण्याचे आदेश २१ जुलै २०१६ ला कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग क्र.१ गोंदिया यांनी दिले आहे. हे दोन्ही बांधकाम सर्वदय मजूर सहकार संस्था तिरोडा अंतर्गत करण्यात आले.
सदर दोन्ही बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून याची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आलेली आहे. गुण नियंत्रक (क्वालिटी कंट्रोल) यांनी कामाची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
बांधकाम सुरू असताना काम करणारे मंजूर हे सर्वदय मजूर सहकार संस्था तिरोडाचे नव्हते. त्याबाबत मजुरांची व्हीडीओ शुटिंगसुद्धा घेतल्याचे सांगितले. याबाबत निकृष्ट कामाची तपासणी व्हावी, तसेच सर्वेदय मजूर सहकारी संस्था तिरोडा, शाखा अभियंता, उपअभियंता यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत बावनकर यांनी केली. याबाबत शाखा अभियंता, उपअभियंता यांच्याशी संपर्क मोबाईलवरुन होऊ शकला नाही. (तालुका प्रतिनिधी )

Web Title: The accusations of making the road of tourist spot a bad quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.