दररोज घडताहेत अपघात : गतिरोधक तयार करण्याची मागणी

By Admin | Updated: May 31, 2015 00:50 IST2015-05-31T00:50:42+5:302015-05-31T00:50:42+5:30

येथील कामठा चौकात अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे हा चौक डेंजर झोन म्हणून

Accidents are happening every day: Demand for speed restriction | दररोज घडताहेत अपघात : गतिरोधक तयार करण्याची मागणी

दररोज घडताहेत अपघात : गतिरोधक तयार करण्याची मागणी

आमगाव : येथील कामठा चौकात अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे हा चौक डेंजर झोन म्हणून ओळखला जात असून येथून ये-जा करण्यास नागरिकांना भिती वाटू लागली आहे. या प्रकाराकडे लक्ष देत सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे ब्रेकर तयार करण्याची तर पोलीस विभागाने वाहतुकीवर नियंत्रणासाठी व्यवस्था करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
कामठा, कालीमाटी ते सालेकसा, डोंगरगड जाणाऱ्या राज्य महामार्गावर आमगाव येथील कामठा चौकात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे मृत्युचे तांडव सुरू आहे. येथे काही दिवसांपूर्वी रस्त्याचे नविनीकरण करण्यात आले, पण अद्याप ब्रेकर किंवा झेब्रा क्रॉसींग तयार करण्यात आले नाही. यामुळे कामठा किंवा सालेकसाकडून येणाऱ्या वाहनांत नेहमीच अपघात होताना दिसून येतात. या मार्गावरून कामठा मार्ग, बालाघाट, रावणवाडी, कालीमाटी, कट्टीपार, आमगाव ते सालेकसा, दरेकसा, डोंगरगड, दुर्ग, रायपूर येथील प्रवासी अधिक प्रमाणात प्रवास करतात.
यामुळेच या रस्त्यावरून ट्रक, मालवाहक, चारचाकी गाडी व दुचाकींची वर्दळ अधिक असते. रस्ता तयार करताना कुठेच ब्रेकर किंवा क्राँसीग देण्यात आली नाही. तसेच दिशा दर्शकाचे फलक पण बसविण्यात आले नाहीत.
कामठा चौकात पोलीस स्टेशनच्या पुढाकाराने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. मात्र वेगवान वाहनांवर कारवाई होत नाही. त्यामुळे कॅमेऱ्यांचा उपयोग होत नसल्याचे बोलले जात आहे. पण लग्न सराईत वऱ्हाडी किंवा नवरदेवाच्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.
यावेळी चालान कमीच फाडले पण कारवाई मात्र करण्यात आली असल्याचे नागरिकांडून बोलले जात आहे. येथील रस्त्यांवर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस विभागाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)

सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांना लगाम घाला
सार्वजनिक बांधकाम विभागाने या चौकात एकही ब्रेकर तयार केले आहे. त्यामुळे वाहनचालक सोसाट्याने आपले वाहन घेऊन येथून निघतात. हेच कारण आहे की आल्या दिवशी येथे अपघात घडत आहेत. यावर उपाय म्हणून चौकात ब्रेकर तयार करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. शिवाय वाहतूक विभागाने वाहतूकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व्यवस्था करावी अशी मागणीही केली जात आहे.

Web Title: Accidents are happening every day: Demand for speed restriction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.