आठ कामांसाठी ८० लाख मंजूर करा
By Admin | Updated: November 2, 2015 01:29 IST2015-11-02T01:29:54+5:302015-11-02T01:29:54+5:30
तिरोडा विधानसभा क्षेत्रात विकासाची गंगा आणण्याचा ध्यास घेतलेले आ. विजय रहांगडाले यांनी पर्यटन विकासाकडे लक्ष घातले असून बेरोजगारी कशी दूर होईल, यावर भर दिला आहे. ..

आठ कामांसाठी ८० लाख मंजूर करा
पर्यटन विकास : विजय रहांगडाले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्र
तिरोडा : तिरोडा विधानसभा क्षेत्रात विकासाची गंगा आणण्याचा ध्यास घेतलेले आ. विजय रहांगडाले यांनी पर्यटन विकासाकडे लक्ष घातले असून बेरोजगारी कशी दूर होईल, यावर भर दिला आहे. त्यानिमित्त तिरोडा विधानसभा क्षेत्रातील आठ कामे प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळावी, यासाठी आ. विजय रहांगडाले यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांना पत्र लिहिले आहे.
पर्यटन क्षेत्राचा विकास झाल्यास तरुणांना काम मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होतील. यासाठी चोरखमारा येथे पर्यटन स्थळांना जलाशयापर्यंत रस्त्याचे रूंदीकरण दहा लाख, शौचालय पेन्टींग ब्लॉक व सुशोभीेकरण दहा लाख, सभामंडप सौंदर्यीकरण-शौचालय दहा लाख, बोदलकसा पेव्हींग ब्लॉक व सुशोभीकरण १० लाख, बोलदकसा जलाशय निरीक्षण गृह पर्यटन विभागाने मुख्य रस्त्यापर्यंत रस्ता डांबरीकरण दहा लाख, केरझरा पर्यटन स्थळ ते पांढरी सिमेंट रस्ता भाग-१ १० लाख, केरझरा पर्यटन स्थळ ते पांगडी सिमेंट रस्ता भाग-२ १० लाख, काशीघाट सौंदर्यीकरण व संरक्षण भिंत १० लाख, असे एकूण ८० लाखांच्या कामांना मंजुरीसाठी आ. विजय रहांगडाले यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्र लिहले आहे.
सदर कामे मंजूर झाल्यास जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचे सौंदर्यीकरण, सुविधा व बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. (शहर प्रतिनिधी)