एसीबीचे अधिकारी भासवून केली २५ हजारांची मागणी

By Admin | Updated: June 5, 2015 01:50 IST2015-06-05T01:50:09+5:302015-06-05T01:50:09+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून दोघांकडून आंगणवाडी सेविकेला गंडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ACB official imposes a demand of 25 thousand | एसीबीचे अधिकारी भासवून केली २५ हजारांची मागणी

एसीबीचे अधिकारी भासवून केली २५ हजारांची मागणी

एक ताब्यात, दुसरा पसार : अंगणवाडी सेविकेला गंडविण्याचा प्रयत्न
गोंदिया : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून दोघांकडून आंगणवाडी सेविकेला गंडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. जवळील फुलचूर येथील आंबाटोली परिसरात गुरूवारी (दि.४) दुपारी ३ वाजता दरम्यान हा प्रकार घडला. प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याचा दुसरा साथीदार मात्र पसार झाला.
आरोपी नरेश मेश्राम (४५,रा.मुर्री) व त्याचा एक साथीदार या दोघांनी आंबाटोली निवासी आंगणवाडी सेविका फिर्यादी मनिषा टेकेश्वर कटरे (४०) यांच्या घरात अनधिकृत प्रवेश केला. या दोघांनी कटरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी असल्याचे सांगून २५ हजार रूपयांची मागणी केली. एवढेच नव्हे तर त्यांना क्षती पोहचविणार अशा धमकावणी करून त्यांच्यावर दबाव टाकला. यावर मात्र कटरे यांना संशय आल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात फोन करून सदर नावाचे इसम विभागात कार्यरत आहेत काय याची विचारणा केली. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या नावाचे इसम विभागात नसल्याचे सांगण्यात आले. यावर त्यांनी लगेच शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. लगेच शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी कटरे यांच्या घरी गेले व त्यांनी नरेश मेश्राम यास ताब्यात घेतले. मात्र त्याचा दुसरा साथीदार पसार झाला. पोलिसांनी कटरे यांच्या तक्रारीवरून भादंवीच्या कलम १७०, ३८५, ४५२, ४१९, ४२०, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. (शहर प्रतिनिधी)
१५ दिवसांपासून सुरू आहे हा प्रकार
आंगणवाडी सेविकांच्या घरी जावून त्यांना किशोरवयीन मुलींना सुविधा, लाभ याशिवाय विविध प्रश्न विचारून पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार मागील १५ दिवसांपासून सुरू असल्याचे कळले. हा प्रकार काही आंगणवाडी सेविकांसोबत घडलेला असल्याने कटरे यांनाही हा प्रकाराबद्दल माहिती होती. यामुळेच त्यांनी सावधगिरी बाळगून या तोतया अधिकाऱ्यांचा पर्दाफाश केला.

Web Title: ACB official imposes a demand of 25 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.