पलिकेतील राजकारण कर्मचाऱ्यांवर वरचढ
By Admin | Updated: April 29, 2015 00:06 IST2015-04-29T00:06:30+5:302015-04-29T00:06:30+5:30
राजकारणातल्या नव नवीन डेवपेचांमुळे नेहमी चर्चेत राहणारी नगरपरिषद आता प्रभारी नगरपरिषद अभियंत्यांच्या सुटीच्या अर्जावरून पुन्हा चर्चेत आली आहे.

पलिकेतील राजकारण कर्मचाऱ्यांवर वरचढ
अभियंत्यांवर दबाव : राजकारणाला कंटाळून दीर्घ रजेचा अर्ज
गोंदिया : राजकारणातल्या नव नवीन डेवपेचांमुळे नेहमी चर्चेत राहणारी नगरपरिषद आता प्रभारी नगरपरिषद अभियंत्यांच्या सुटीच्या अर्जावरून पुन्हा चर्चेत आली आहे. पालिकेतील राजकारणामुळे कामात त्रास होत असल्याच्या त्यांच्या अर्जामुळे पालिकेतील राजकारण कर्मचाऱ्यांवर वरचढ होत असल्याची पुष्टी होते. हेच कारण आहे की नगरपरिषद अभियंता दीर्घ सुटीवर गेले आहेत.
गोंदियातले राजकारण म्हणताच भल्याभल्यांना घाम फुटतो. त्यात नगरप्रिषदेतील राजकारणाला तर काही तोडच नाही. सत्तेपासून तर कामांना घेऊन नगरपरिषदेत होत असलेल्या राजकारणाशी शहरवासी चांगलेच परिचीत आहेत. मात्र राजकारणातल्या या डावपेचांत येथील अधिकारी व कर्मचारी त्रस्त होत असल्याचे आता प्रभारी नगरपरिषद अभियंता डवलेंमुळे स्पष्ट झाले. तर राजकारणामुळेच पालिकेतील अधिकारी व कर्मचारी तसेच येथील कामांवरही प्रभाव पडत असल्याचे म्हणता येईल.
प्राप्त माहितीनुसार, प्रभारी नगरपरिषद अभियंता डवले सुमारे सहा महिन्यांपूर्वी गोंदिया नगरपरिषदेत आले. पूर्वीचे दोन वर्ष कनिष्ठ अभियंता म्हणून कार्य केल्यावर त्यांच्याकडे पालिका अभियंत्यांचा प्रभार देण्यात आला आहे. यातच त्यांचा पालिकेतील राजकारणाशी जवळचा संबंध आला असावा व त्यांनी १७ एप्रिल पासून दिर्घ सुटीवर जाण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना अर्ज दिला.
या अर्जाची विशेषता अशी की, त्यात डवलेंनी पालिकेतील राजकीय व प्रशासकीय वातावरणात काम करण्यात व त्यात जुळवून घेण्यास अडचण व त्रास होत असल्याचे नमूद आहे. त्यांच्या या पत्रानुसार, पालिकेतील राजकारण शिवाय प्रशासनामुळे त्यांना कामे करण्यात अडचण होत असल्याचे स्पष्ट होते. अशात राजकारण आता येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वरचढ होत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. (शहर प्रतिनिधी)
कनिष्ठ अभियंता
कावडे निलंबित
एकीकडे डवले दीर्घ रजेवर गेले असतानाच दुसरीकडे पालिकेतील कनिष्ठ अभियंता रवींद्र कावडे यांना मुख्याधिकाऱ्यांनी निलंबीत केले आहे. प्रशासकीय अधिकारी राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्याधिकारी मागील महिन्यांपासून कनिष्ठ अभियंता कावडे यांना मजुरांच्या भविष्य निर्वाह निधी कपातीबाबतची माहिती मागत होते. मात्र कावडे यांनी सदर माहिती सादर केली नाही. परिणामी मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना निलंबीत केले असून २३ एप्रिल रोजी तसे आदेश काढण्यात आले आहे.
मी सुटीवर गेलो होतो, मात्र आता माझी नाराजी दूर झाली आहे. आता मी परत आलो आहे.
- सुनील डवले
नगर परिषद अभियंता