चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला त्र्यंबकेश्वरमध्ये अटक
By Admin | Updated: October 5, 2016 01:05 IST2016-10-05T01:05:15+5:302016-10-05T01:05:15+5:30
गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत एकोडी येथील आरोपीने सन १९९० मध्ये एका ^६ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केला होता.

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला त्र्यंबकेश्वरमध्ये अटक
गोंदिया : गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत एकोडी येथील आरोपीने सन १९९० मध्ये एका ^६ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केला होता. तेव्हापासून हा आरोपी फरार होता. अखेर गंगाझरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांनी आरोपीला नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे अटक केली. सलग चार दिवस त्र्यंबकेश्वर येथे पोलिसांनी सापळा रचला होता.
आरोपी रमेश प्रितीचंद हरिणखेडे (६०) रा.एकोडी हा अप क्र.५४/१९८९ कलम ३७६ चा आरोपी होता. त्याला अटक करण्यात आली होती. तो सहा महिने तुरूंगात राहीला. नंतर जमानतीवर सुटलेल्यानंतर पगशीवर हजर न झाल्याने न्यायाुयाने त्याला फरार घोषित करण्यात आले होते. तेव्हापासून पोलिसांना या आरोपीचा शोध होता. गंगाझरी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सदर आरोपी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंकबेश्वर येथील एका हॉटेलमध्ये मजूरी करून असल्याची माहिती मिळाली. त्यावर गंगाझरीचे पोलिस निरीक्षक सुनिल उईके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बळीराम घंटे, पोलीस हवालदार गायधने, पोलीस नायक नरेश मारवाडे यांनी त्र्यंकबेश्वर गाठले.
सलग चार दिवस तेथे राहून एका हॉटेलातून आरोपी हरिणखेडेला अटक केली. त्यानंतर त्याला गंगाझरी पोलिस ठाण्यात आणून सोमवारी (दि.३) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १७ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक बळीराम घंटे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)